साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक : शामराव देसाई

साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक : शामराव देसाई
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक : शामराव देसाई

कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर असताना कारखानदार ‘एफआरपी’साठी अनुदान, साखर निर्यात, साखरेची द्विस्तरीय विक्री किंमत, बफरस्टॉक अशा निरर्थक मागण्या करत आहेत. सर्व मागण्या शहाणपणाच्या नाहीत, उसापासून थेट इथेनॉलनिर्मिती हेच धोरण योग्य असूनही त्याची मागणी होत नाही, असा आरोप जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई यांनी केला.  श्री. देसाई म्हणाले, ‘‘यावर्षीच्या हंगामात देशात ३१० लाख टन अपेक्षित आहे. देशाची २४० लाख टन साखरेची गरज वजा जाता ७० लाख टन साखर शिल्लक रहाणार आहे. गेल्यावर्षीची ५० लाख टन आणि यावर्षीची ७० लाख टन अशी सुमारे १२० लाख टन साखर शिल्लक असेल. अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर असताना कारखानदार मात्र अजून साखर झोपेतच आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘देशात आज साखरेचे भाव प्रती किलो २८ रुपये आहे. ते २५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. कारखानदार व संघटना साखर निर्यात अनुदानापोटी प्रति क्विंटल एक हजार रुपयांची मागणी करत आहेत. वास्तविक देशाबाहेर साखरेचे दर भारतापेक्षा खूपच कमी म्हणजे प्रति किलो २३ रुपये आहेत. साखर निर्यातील परवानगी मागणे व शासनाने ती मान्य करणे हे कोणत्या शास्त्रात बसते.’’  २००६ पासून आमची संघटना थेट उसापासून इथेनॉलनिर्मितीची व दर वाढीची मागणी करत आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात प्रति लिटर २७ रुपये असलेला इथेनॉलचा दर आता ४८.५० रुपये झाला. या दराने इथेनॉलची विक्री झाली तर उसाला प्रति टन ३८०० ते ४००० हजार रुपये दर शक्‍य आहे. २००५-०५ च्या हंगामात थेट उसापासून इथेनॉलनिर्मिती करून उसाला प्रतिटन १७०० रुपये दर देण्याचे मान्य करून रिलायन्सने इथेनॉलनिर्मितीचे कारखाने काढण्याची परवानगी मागितली, पण ती नाकारली. आताही रिलायन्सचे भूत मानगुटीवर बसेल म्हणून थेट उसापासून इथेनॉलनिर्मितीबाबत कारखानदार व नेतेही बोलत नसल्याचे श्री. देसाई म्हणाले. या वेळी सुजाता देसाई, नारायण पोवार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com