agriculture news in marathi, sugar factories due payment less by three thousand crore | Agrowon

साखर कारखान्यांकडील थकीत रकमेत तीन हजार कोटींची घट
वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी मागच्या काही महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या थकीत बिलाची रक्कम तीन हजार कोटींनी कमी झाल्याचा दावा केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी केला. राज्यांच्या अन्नमंत्र्यांची परिषद दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पासवान पत्रकारांशी बोलत होते. 

केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी मागच्या काही महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या थकीत बिलाची रक्कम तीन हजार कोटींनी कमी झाल्याचा दावा केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी केला. राज्यांच्या अन्नमंत्र्यांची परिषद दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पासवान पत्रकारांशी बोलत होते. 

केंद्र सरकारकडील एक जूनच्या आकडेवारीनुसार देशातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे एकूण २२ हजार ६५४ कोटी रुपये थकीत होते. ही रक्कम २५ जूनपर्यंत १९ हजार ८१६ कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे.  साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत रक्कम लवकरात लवकर अदा करावी, असे आवाहन पासवान यांनी केले. ``शेतकऱ्यांचे पैसे चुकते करण्याची जबाबदारी साखर कारखान्यांची आहे. कारखान्यांकडे त्यासाठी पैसे नाहीत, यावर आपला विश्वास नाही,`` असे पासवान म्हणाले. यंदा विक्रमी साखर उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत घसरलेले दर यामुळे साखर कारखाने तोट्याच्या गर्तेत सापडले आहेत. साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्या पाच महिन्यांत केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या, असे पासवान म्हणाले. साखरेवरील आयातशुल्क दुप्पट करणे, निर्यातशुल्क रद्दबातल करणे आणि साडेआठ हजार कोटी रुपयांचे पॅकेज, इथेनॉलच्या दरात वाढ आदींचा त्यात समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.   

इतर अॅग्रोमनी
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...