agriculture news in marathi, Sugar factories electricity may be purchased by 5 rupees per unit | Agrowon

पाच रुपये दराने वीज खरेदी होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांच्या रखडलेल्या वीज खरेदी करारातील अडथळे दूर करण्यासाठी अखेर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. कारखान्यांची वीज पाच रुपये युनिटने खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील १४ कारखान्यांची ३०० मेगावॉट वीज प्रतियुनिट पाच रुपयांनी खरेदी केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांच्या रखडलेल्या वीज खरेदी करारातील अडथळे दूर करण्यासाठी अखेर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. कारखान्यांची वीज पाच रुपये युनिटने खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील १४ कारखान्यांची ३०० मेगावॉट वीज प्रतियुनिट पाच रुपयांनी खरेदी केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

वीज वितरण कंपनीने साखर कारखान्यांची तयार केलेल्या एकूण विजेपैकी फक्त १०० मेगावॉट वीज घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यातही अवघ्या चार रुपये प्रतियुनिट दर देऊ केला आहे. कारखान्यांनी हा दर अमान्य करीत जादा वीज खरेदी करण्याचाही आग्रह धरलेला आहे. त्यामुळे वीज कंपनी व साखर कारखान्यांचे करार यंदा रखडले असून, कारखान्यांना त्यातून कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. 

‘‘साखर कारखाने व वीज कंपनीमधील वाद एमईआरसी म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा नियंत्रण आयोगापर्यंत गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत बैठक घेतली होती. तथापि, तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख स्वतः कारखान्याच्या प्रतिनिधीशी चर्चा केली असून, वीज कंपनीचीही भूमिका समजून घेतली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

साखर उद्योगाच्या म्हणण्यानुसार, साखर कारखान्यांची वीज सव्वासहा रुपये प्रतियुनिट दराने खरेदी करण्याचे आश्वासन शासनाने यापूर्वी दिले होते. त्यावर विश्वास ठेवून राज्यातील १५ साखर कारखान्यांनी अडीच हजार कोटी रुपये गुंतवून बगॅस आधारित नवे सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारले. बॅंकांनीही त्यासाठी कोट्यवधींची कर्जे दिली आहेत. मात्र आता योग्य दराने वीज खरेदी करार करण्यास शासन नकार देत आहे. सहकारमंत्र्यांना याबाबत आम्ही सविस्तर माहिती दिली आहे. 

सर्वसमावेशक दरधोरणासाठी प्रय़त्न होणार 
‘सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्याच्या ऊर्जा विभागाचे सचिव, साखर संघ, महाऊर्जा आणि साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांशी चर्चा केली आहे. हा प्रश्न धसास लावण्यासाठी श्री. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे. कारखान्यांनी तसेच वीज कंपनीने देखील आपल्या दराचा हट्ट सोडून सर्वसमावेशक दरधोरण ठरविता येते का, याचा प्रयत्न श्री. देशमुख यांच्याकडून होत आहे’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...