agriculture news in marathi, sugar factories from karnatka ignores to pay arrears, Maharashtra | Agrowon

कर्नाटकातील कारखान्यांकडून ऊस बिले देण्यास टाळाटाळ
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

कर्नाटकातील एका साखर कारखान्याला माझ्याकडील ४०० टन ऊस गाळपाला गेला. पहिला ॲडव्हान्स वेळेत मिळालाच नाही. चार महिन्यांनी प्रतिटनाला २ हजार रुपये ॲडव्हान्स दिला. अजून ३ लाख रुपये कारखान्याकडून येणे बाकी आहे. कारखान्याच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. 
- हणमंतराव गायकवाड, सरपंच, संतोषवाडी, ता. मिरज, जि. सांगली

सांगली ः मिरज पूर्व भागापासून कर्नाटकातील साखर कारखाने जवळ अंतरावर आहेत. हंगामात या कारखान्यांना ऊस लवकर गाळपाला देऊन पुढील पीक घेण्यासाठी शेतकरी नियोजन करीत असतात. गत हंगामात मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांनी कर्नाटकातील साखर कारखान्यांना ऊस दिला. मात्र ऊस गाळपाला गेल्यानंतर चार महिन्यांनी या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिली उचल दिली. उर्वरित रक्कम अद्यापही मिळालेली नाही.

कर्नाटकातील साखर कारखाने उस उत्पादक शेतकऱ्यांना गतहंगामातील ऊसबिले देण्यास टाळाटाळ करीत असून, शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी दिलेले धनादेश रकमेअभावी परत जात आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मिरज पूर्व भागापासून कर्नाटक सीमा जवळ आहे. त्यामुळे या भागातून कर्नाटकातील साखर कारखान्यांना ऊस गाळपासाठी पाठविला जातो. सलगरे, चाबुकस्वारवाडी, बेळंकी, जानराववाडी, संतोषवाडी, कदमवाडी, कोंगनोळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कर्नाटकातील केंपवाड, कोकटनूर, कागवाड, शिरगुप्पी येथील कारखान्यांना गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस पाठविला होता, मात्र या कारखान्यांनी अजून ऊसबिले दिलेली नाहीत. कारखाने शेतकऱ्यांना थकीत ऊस बिलापोटी धनादेश देत आहेत. हे धनादेश बॅंकेत भरण्यासाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत.

मात्र, कारखान्यांच्या खात्यावर रक्कमच नसल्याने हे धनादेश बॅंकेत पडून आहेत. शेतकऱ्यांना कारखान्यांच्या पतसंस्थांमधून थकीत ऊस बिलाऐवजी १५ टक्के व्याज आकारणी करून कर्जरूपी ॲडव्हान्स म्हणून रक्कम दिली जात आहे.  चालू हंगामात देखील अपेक्षित प्रमाणात पाऊस नसल्याने कर्जाऊ रक्कम घेण्यासाठी शेतकरी कारखान्यांच्या पतसंस्था मध्ये रांगा लावत आहेत. थकीत लाखो रुपयांच्या ऊस बिलावर कारखाना प्रशासन किती टक्के व्याज देणार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

आर्थिक गणित कोलमडले
ऊस पिकासाठी शेतकरी सोसायटीचे कर्ज घेतात. गाळपाला पाठविलेल्या उसाची बिलेच जमा झाली नसल्याने सोसायटीमार्फत घेतलेले पीककर्ज भरणे मुश्‍कील झाले आहे. पैसे मिळत नसल्याने सोसायटीची कर्जे थकली आहेत. तसेच काटामारी, वाढविलेले कंपोस्ट खतांचे दर आणि थकविलेली ऊस बिले यामुळे ऊस उत्पादक शेतकरी बेजार झाले असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. टनाला २९०० रुपये दर जाहीर करून २००० रुपयांचा पहिला हप्ता काही कारखान्यांनी दिला असून दुसरा हप्ता लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बेळगाव येथील अथणी शुगर शी याबाबत संपर्क केला असता थकीत बिलाबाबत कारखाना प्रशासनाने माहिती देण्यास टाळाटाळ केली.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...