agriculture news in marathi, Sugar Factories to less the first payment to 2500 rps per ton | Agrowon

साखर कारखान्यांनी पहिला हप्ता घटविला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : साखरेच्या घसरत्या किमतीचा फटका अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील ऊस उत्पादकालाच बसला आहे. साखरेच्या दरात कमालीची घसरण झाल्याने जिल्ह्यातील कारखान्यांनी येथून पुढे तोडणी होणाऱ्या उसास पहिला हप्ता प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे देण्याचा निर्णय बुधवारी (ता. ३१) येथे झालेल्या बैठकीत घेतला. हंगामाच्या प्रारंभी एफआरपी अधिक दोनशे रुपये असा पहिला हप्ता कारखान्यांनी जाहीर केला होता. जिल्ह्यातील रिकव्हरीनुसार व कारखान्यांचा वाढीव दर या सूत्रानुसार ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत जात होती. 

कोल्हापूर : साखरेच्या घसरत्या किमतीचा फटका अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील ऊस उत्पादकालाच बसला आहे. साखरेच्या दरात कमालीची घसरण झाल्याने जिल्ह्यातील कारखान्यांनी येथून पुढे तोडणी होणाऱ्या उसास पहिला हप्ता प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे देण्याचा निर्णय बुधवारी (ता. ३१) येथे झालेल्या बैठकीत घेतला. हंगामाच्या प्रारंभी एफआरपी अधिक दोनशे रुपये असा पहिला हप्ता कारखान्यांनी जाहीर केला होता. जिल्ह्यातील रिकव्हरीनुसार व कारखान्यांचा वाढीव दर या सूत्रानुसार ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत जात होती. 

परंतु बुधवारी कारखान्यांनी सरसकट पहिला हप्ता २५०० रुपये जाहीर केल्याने आता पहिल्या हप्त्यातच टनामागे पाचशे रुपये कमी मिळणार आहेत. जाहीर केलेली उर्वरित रक्कम नक्की देऊ; पण त्यासाठी जादाची रक्कम उपलब्ध व्हावी लागेल, त्यानंतर ती देण्यात येणार असल्याचे कारखानदारांनी सांगितले. 

कारखानदार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या वेळी साखर हंगाम सुरू झाला, त्या वेळी साखरेचे दर ३६०० रुपये इतके होते. गळीत हंगाम सुरू झाला त्या वेळी ठरल्याप्रमाणे बिले अदा केली आहेत. हंगाम सुरू झाल्यानंतर अचानकपणे तीन महिन्यांत साखरेचे दर २६०० रुपयांवरून २८०० रुपयांपर्यंत घसरले. यातच साखरेचा उठाव नाही व राज्य बॅंकेनेही मूल्यांकनात घट केली आहे. बॅंकेकडून निर्माण होणारी रक्कम पाहता ती पहिल्या हप्त्यासाठी अपुरी ठरते. बॅंकेतून मिळणाऱ्या रकमेतून मागच्या कर्जाचे हप्ते, व्याज, साखर तयार करण्यासाठी येणारा प्रक्रिया खर्च, असा खर्च वजा जाता टनास १७७५ रुपयेच उपलब्ध होत आहेत. 

जिल्ह्याचा सरासरी उतारा १२.५० टक्के इतका आहे. यातून मोलॅसिस, बगॅस, प्रेसमड इत्यादीचे उत्पादनातून २७६४ रुपये उपलब्ध होत आहे. ६०० रुपये तोडणी खर्च वजा जाता प्रतिटन २१६४ रुपये कारखान्यांकडे उपलब्ध होतात. कारखान्यांनी जाहीर केलेले दर व प्रत्यक्ष उपलब्ध होणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. बॅंकाही रक्कम देण्यास तयार नाही. यामुळे कारखानदारांनी २५०० रुपयेप्रमाणे दर देण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर केलेली रक्कम कारखानदार नक्की देतील; परंतु पैशाची उपलब्धता झाल्यानंतर देण्याचा निर्णय कारखानदारांनी या बैठकीत घेतल्याचे कारखानादार सूत्रांनी सांगितले. 

एफआरपीपेक्षाही कमी हप्ता?
जिल्ह्यातील कारखान्यांची सरासरी रिकव्हरी साडेबारा टक्के इतकी आहे. या रिकव्हरीनुसार एफआरपीचा पहिला हप्ता २७०० रुपयांपर्यंत होतो. यामुळे सध्या तरी पहिला हप्ता एफआरपीपेक्षा कमीच मिळण्याची शक्‍यता असल्याच्या साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. साखरेचे दर वाढल्याशिवाय पुढील रक्कम लवकर मिळण्याची शक्‍यता धूसर असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितल्याने आता पुन्हा एकदा पहिल्या हप्त्याचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्‍यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...