Agriculture News in Marathi, sugar factories should be give full FRP, Said chief ministrer devendra fadnavis, Maharashtra | Agrowon

एफअारपी पूर्ण द्या; सरकार मदत करेल : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 नोव्हेंबर 2017
वाळवा, जि. सांगली : साखर कारखान्यांसाठी ७०-३० चा फॉर्म्युला स्वीकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. नफ्यातला हिस्सा शेतकऱ्याला गेला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. कारखान्यांनी ‘एफआरपी' पूर्ण द्यावी; त्यांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांचे हित जपणारे एकमेव आमचे सरकार आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
वाळवा, जि. सांगली : साखर कारखान्यांसाठी ७०-३० चा फॉर्म्युला स्वीकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. नफ्यातला हिस्सा शेतकऱ्याला गेला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. कारखान्यांनी ‘एफआरपी' पूर्ण द्यावी; त्यांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांचे हित जपणारे एकमेव आमचे सरकार आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्‌घाटन व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता.२५) झाले. त्या वेळी ते बोलत होते. त्या वेळी ते बोलत होते. 
 
या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार पतंगराव कदम, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी आदी उपस्थित होते. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘वाळवा ही क्रांतिकारकांची भूमी आहे. क्रांतिभूमीत क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या अस्थीचे दर्शन घेण्याची मला प्रथमच संधी मिळाली. अण्णांच्या समाधी दर्शनातून मला आणखी उचित काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.’’
 
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की हुतात्मा कारखाना उत्कृष्टरीत्या सुरू आहे. कोणतेही उपपदार्थ घेत नसलेला हा कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला अधिक दर देत आहे. राज्यातील कारखान्यान्यांनी याचा आदर्श घेतला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल.’’
 
वैभव नायकवडी म्हणाले, की पहिल्यापासूनच उसाला अधिक दर देण्याची आमची भूमिका होती, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना सर्वात अधिक दर देत आहे.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...