agriculture news in Marathi, Sugar import duty will be 100 percent, Maharashtra | Agrowon

साखर आयात शुल्क १०० टक्के होणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजार चालू गाळप हंगाम सुरू झाल्यापासून साखरेचे दर पडले आहेत. त्यामुळे पडलेले दर सुधारण्यासाठी सरकार आयात शुल्कात ५० टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. या संबंधीचा निर्णय सोमवारपर्यंत होऊन शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजार चालू गाळप हंगाम सुरू झाल्यापासून साखरेचे दर पडले आहेत. त्यामुळे पडलेले दर सुधारण्यासाठी सरकार आयात शुल्कात ५० टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. या संबंधीचा निर्णय सोमवारपर्यंत होऊन शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

देशातील कारखान्यांना दिलास देण्यासाठी अन्न मंत्रालायाने या आधीच वित्त मंत्रालयाकडे साखर आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकार आयात शुल्क वाढविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंबंधीची सूचना एक ते दोन दिवस किंवा जास्तीत जास्त सोमवारपर्यंत निघू शकते. पाकिस्तानमध्ये यंदाच्या चालू हंगामात विक्रमी उत्पादनाचा अंदाज जाहीर करण्यात आला होता. तसेच मागील हंगामातील साखरेचा साठाही शिल्लक होता.

त्यामुळे तेथील सरकारने साखरेला प्रतिकिलो १०.७० पाकिस्तानी रुपये (१ पाकिस्तानी रुपया = ०.६१ भारतीय रुपया) अनुदान देऊऩ १.५ दशलक्ष टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पाकिस्तानमधील सिंध प्रांत सरकारने साखरेला आणखी प्रतिकिलो ९.३० पाकिस्तानी रुपये अनुदान देऊन शिल्लक साखर निर्यात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पाकिस्ताची अनुदानित साखर भारतात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. 

देशात आधीच साखरेचे दर पडल्याने साखर उद्योग अडचणीत आला होता. कारखान्यांना तर शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी कसरत करावी लागणार असल्याचे उद्योगाने सरकारला सांगितले. त्यामुळे कारखानदार आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मागील पंधरवाड्यात केंद्र सरकारशी चर्चा करुन साखर आयात शुल्क ५० टक्क्यांवरून ६० टक्के करण्याची मागणी केली होती. तसेच या मागणीला अनुसरून अन्न मंत्रालायानेही वित्त मंत्रालयाकडे पाकिस्तानची साखर रोखण्यासाठी आयात शुल्क किमान ८० टक्क्यांपेक्षा जास्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकार आयात शुल्क १०० टक्के करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारखान्यांवर विक्रीमर्यादा लावण्याचा विचार
देशात यंदा साखरेचा अतिरिक्त पुरवठा व पडलेल्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी कारखान्यांवर मासिक विक्री मार्यादा लावण्याचा सरकारचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. साखर कारखान्यांवर मासिक मर्याद लावून सरकार देशातील साखरेचा साठ्याचा अंदाज घेणार आहे. या संबंधीची सूचना सरकार येत्या आठवडाभारात काढणार असल्याची माहिती सरकारी अधीकाऱ्यांनी दिली. चालू गाळप हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या दरात १५ टक्के घट झाली होती. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले होते. हंगाम सुरू झाल्यानंतर इस्माने यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. त्याचा परिणाम साखरेच्या बाजारावर झाला.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...