agriculture news in marathi, Sugar industries cant run without subsidy says Rohit Pawar | Agrowon

अनुदानाशिवाय साखर उद्योग चालणे कठीण : रोहित पवार
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

सोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात १९ ते २० रुपयांच्या दरम्यान असलेले साखरेचे दर, आपल्या देशात साखर उत्पादनासाठी प्रतिकिलो येणारा ३४ रुपयांचा खर्च पाहता साखर उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारखानदारांनी साखर निर्यात करावी यासाठी कारखानदारांना प्रतिकिलो किमान दहा रुपये व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकारने थेट अनुदान द्यावे. त्याशिवाय येत्या हंगामात साखर उद्योग चालणे कठीण असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहित पवार यांनी दिली. 

सोलापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात १९ ते २० रुपयांच्या दरम्यान असलेले साखरेचे दर, आपल्या देशात साखर उत्पादनासाठी प्रतिकिलो येणारा ३४ रुपयांचा खर्च पाहता साखर उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारखानदारांनी साखर निर्यात करावी यासाठी कारखानदारांना प्रतिकिलो किमान दहा रुपये व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकारने थेट अनुदान द्यावे. त्याशिवाय येत्या हंगामात साखर उद्योग चालणे कठीण असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहित पवार यांनी दिली. 

उपाध्यक्ष पवार म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर व साखर उत्पादन खर्च यामध्ये १४ ते १५ रुपयांची तफावत आहे. सरकारने जर दहा रुपयांचे अनुदान दिले, तर साखर कारखानदार सध्या किलोला पाच रुपये नुकसान सहन करू शकतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या दरासोबत स्पर्धा करण्याची क्षमता आता देशातील साखर उद्योगाकडे राहिली नाही. निर्यातीसाठी प्रतिकिलो दहा रुपये अनुदान कारखान्यांना दिल्यास येत्या काळात साखरेचे दरही स्थिर राहतील, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. देशातील साखर उद्योगांकडे शेतकऱ्यांना देय असलेले साधारणतः २१ हजार कोटी रुपये आहेत.

महाराष्ट्रातील साखर कारखानदारांकडे साधारणतः अडीच हजार कोटी रुपयांची रक्कम आहे. साखर उद्योगाकडे आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका उदासीन दिसत आहे. यंदाच्या हंगामात गाळपासाठी मुबलक ऊस असल्याने चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु साखरेचे दर सातत्याने घसरले आहेत. सहवीजनिर्मिती, इथेनॉलच्या दरातही कपात झाली. जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दर देण्याची कारखानदारांची इच्छा असतानाही केंद्र सरकारच्या या धोरणांमुळे हा दर ते देऊ शकले नाहीत. येत्या हंगामापूर्वी सरकारने साखर उद्योगाबाबत ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षाही उपाध्यक्ष पवार यांनी व्यक्त केली.  

दीड वर्षात करावी लागेल ८० लाख टन साखर निर्यात
सध्या उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने येत्या हंगामात प्रचंड साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या साखरेपैकी २० लाख टन व पुढील हंगामातील ६० लाख टन साखर येत्या एक ते दीड वर्षात निर्यात करावी लागणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आतापासून नियोजन करणे आवश्‍यक असल्याचेही उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...