agriculture news in marathi, Sugar Industry demands 140 crore for buffer stock | Agrowon

साखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची तरतूद करावी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

भवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल २८०० रुपयांनी देखील विकली जात नसल्याने राज्य सरकारने साखरेला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान दिले, तरच साखरेची निर्यात करता येईल. तसेच राज्यातील २५ लाख टन साखरेचा बफर स्टॉक करून त्याचे व्याज सरकारने भरावे, यासाठी राज्य सरकारने १४० कोटींची तरतूद येत्या १५ दिवसांत करावी, अशी मागणी राज्य साखर संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल २८०० रुपयांनी देखील विकली जात नसल्याने राज्य सरकारने साखरेला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान दिले, तरच साखरेची निर्यात करता येईल. तसेच राज्यातील २५ लाख टन साखरेचा बफर स्टॉक करून त्याचे व्याज सरकारने भरावे, यासाठी राज्य सरकारने १४० कोटींची तरतूद येत्या १५ दिवसांत करावी, अशी मागणी राज्य साखर संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. बुधवारी (ता. ४) राज्य साखर संघाने हा ठराव केला. हर्षवर्धन पाटील म्हणाले,` राज्यात १०४ लाख टन साखर उत्पादित होणार आहे. हा आजवरचा उच्चांक आहे. मात्र साखरेला २८०० रुपये देखील आज भाव मिळत नाही, त्यामुळे राज्यात मार्च अखेर ऊस खरेदीची ३५०० कोटींची देणी अडकली आहेत. 

उत्तर प्रदेशात १०३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे, मात्र ती साखर उत्तरेकडील राज्यांत जाते, त्यामुळे तेथे १०० ते १५० रुपयांनी अधिक भाव मिळतो. महाराष्ट्राला ही वाहतूक खर्चिक ठरते. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याची ६.७० लाख टन साखर निर्यातीचे आदेश दिले आहेत. ही साखर नक्कीच निर्यात होईल. मात्र आज साखरेचा उत्पादन खर्चच ३२०० रुपये प्रतिक्विंटल आहे. अशावेळी साखर निर्यात करायची झाल्यास ती तोट्यात होईल. याकरिता शेतकरी हितासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, साखरेला प्रतिटनी १ हजार रुपये अनुदान द्यावे. राज्याकरिता सरकारला केवळ ७० कोटींची तरतूद करावी लागेल. तसे झाल्यास केंद्र सरकारने राज्यासाठी निर्यातीसाठी घालून दिलेल्या ६.७० लाख टन साखरेची निर्यात करता येईल, असेही पाटील यांनी सांगितले. 

पाटील म्हणाले, ‘राज्यातच नव्हे तर देशात अतिरिक्त साखर उत्पादन होणार असून, त्यापैकी २५ लाख टन साखर बफर स्टॉक म्हणून कारखान्यांच्याच गोदामात ठेवावी. त्यापोटी कारखान्यांनी बॅंकांकडून घेतलेल्या मालतारणावरील वर्षभराचे केवळ व्याज सरकारने भरावे, यासाठी ७० कोटींचा भार पडेल. थोडक्यात दोन्ही मिळून १४० कोटींची गरज आहे, मात्र त्यातून राज्यातला साखर उद्योग सावरला जाईल.’

साखर संघाच्या मागण्या

  • साखर निर्यातीला प्रतिटन १ हजार रुपये अनुदान द्यावे.
  • गोदामात शिल्ल्क असलेल्या २५ लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा.
  • त्या साखर पोत्यांवरील बॅंकेकडून घेतलेल्या मालतारण कर्जाचे व्याज सरकारने भरावे. त्यासाठी ७० कोटींची तरतूद करावी.
  • सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी २० लाख टन साखर राज्याने ३२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करावी.
  • सप्टेंबर २०१८ पर्यंत राज्यातून ६.७० लाख टन साखर निर्यात करण्याची जबाबदारी आमची.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...