agriculture news in Marathi, sugar mills have been crushing 125 lac ton sugarcane till now, Maharashtra | Agrowon

राज्यात आतापर्यंत उसाचे १२५ लाख टन गाळप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

पुणे : ऊसदरासाठी राज्याच्या काही भागांत आंदोलने सुरू असताना, गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळपाचा वेग मात्र चांगला असून, आतापर्यंत १२५ लाख टन गाळप झाले आहे.  राज्यात १९३ साखर कारखान्यांनी यंदा गाळप चालू केले आहे. मात्र, गाळप परवाना आतापर्यंत फक्त १७० कारखान्यांना मिळालेला आहे. यातील १६० साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यात ८९ सहकारी आणि ७१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : ऊसदरासाठी राज्याच्या काही भागांत आंदोलने सुरू असताना, गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळपाचा वेग मात्र चांगला असून, आतापर्यंत १२५ लाख टन गाळप झाले आहे.  राज्यात १९३ साखर कारखान्यांनी यंदा गाळप चालू केले आहे. मात्र, गाळप परवाना आतापर्यंत फक्त १७० कारखान्यांना मिळालेला आहे. यातील १६० साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यात ८९ सहकारी आणि ७१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

उसाची उपलब्धता गेल्या वर्षी केवळ ६.३३ लाख हेक्टरवर होती. यंदा तीन   लाख हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली असून, यंदाची एकूण उपलब्धता ९.०२ लाख हेक्टरवर राहील, असा अंदाज आहे. गुऱ्हाळे तसेच परराज्यांत भरपूर ऊस जात असल्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना उपलब्ध उसातून गाळपासाठी अंदाजे ६५० लाख टन ऊस मिळेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
 
‘‘ऊस भरपूर उपलब्ध असला तरी गाळप क्षमतेबाबत तांत्रिक अडचण नाही. कारण, सुरू झालेल्या कारखान्यांची सध्याची एकूण प्रति दिन गाळप क्षमता ५ लाख ४० हजार टन इतकी आहे. त्या तुलनेत गाळपाला कमी ऊस येत असल्याने आतापर्यंत १२५ लाख टन गाळप झाले आहे. अर्थात, आंदोलनाची धग कमी झाल्यास उसाचा पुरवठा वाढून गाळपाला वेग मिळेल,’’ अशी अपेक्षा साखर उद्योगातून व्यक्त केली जात आहे. 

राज्यातील विभागनिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन स्थिती 
(ऊस गाळप ः लाख टनांत) (उत्पादन ः लाख क्विंटल)

विभाग     कारखाने     गाळप     उत्पादन     उतारा (टक्के)
कोल्हापूर    ३५     २९.२६     २९.३४     १०.०३
पुणे     ५७     ४७.५५     ४४.०४     ९.२६
अहमदनगर  २१     १९.७२     १७.१४     ८.६९
औरंगाबाद   १८     ११.४     ८.२८     ७.२४
नांदेड     २६     १६.३७     १३.३७     ८.१६
अमरावती    २     १.१५     १.००     ८.७०
नागपूर     १     ०.१२     ०.०८     ६.०६
एकूण     १६०     १२५     ११३     ९.०२

 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...