उत्तर प्रदेशसह बिहारमधील साखर उत्पादन वाढणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017
नवी दिल्ली ः उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारमध्ये साखर उत्पादन यंदा वाढणार असल्याचे संकेत मिळत अाहेत. उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन यंदा वाढून ते १०.३ दशलक्ष टनांवर पोचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे. 
 
बिहारमध्येही ऊस पीकक्षेत्र वाढले अाहे. त्यात अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस वाणाच्या लागवडीमुळे यंदाच्या हंगामात अधिक साखर उत्पादन अपेक्षित अाहे. यंदाच्या हंगामात साखर उत्पादन ५ लाख ५० हजार टन साखर उत्पादन मिळेल, असा अंदाज बिहारमधील साखर कारखान्यांनी व्यक्त केला अाहे.
 
नवी दिल्ली ः उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारमध्ये साखर उत्पादन यंदा वाढणार असल्याचे संकेत मिळत अाहेत. उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन यंदा वाढून ते १०.३ दशलक्ष टनांवर पोचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे. 
 
बिहारमध्येही ऊस पीकक्षेत्र वाढले अाहे. त्यात अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस वाणाच्या लागवडीमुळे यंदाच्या हंगामात अधिक साखर उत्पादन अपेक्षित अाहे. यंदाच्या हंगामात साखर उत्पादन ५ लाख ५० हजार टन साखर उत्पादन मिळेल, असा अंदाज बिहारमधील साखर कारखान्यांनी व्यक्त केला अाहे.
 
गेल्या वर्षी बिहारमध्ये ५ लाख २५ हजार टन साखर उत्पादन झाले होते. मात्र, गेल्या महिन्यांत अालेल्या पुरामुळे राज्यातील खरीप पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले अाहे. राज्यातील ३८ पैकी १९ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला अाहे. शेतशिवारात पाणी साठून राहिल्याने ऊस पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले अाहे. ऊस पिकांत पाणी साठून राहिल्याने साखर उतारा कमी मिळण्याची शक्यता अाहे.
 
तसेच यंदा गाळप हंगाम उशिरा सुरू होणार असल्याची चिन्हे दिसत अाहेत, असे एका साखर कारखान्यातील अधिकाऱ्याने सांगितले. दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरवातीला बिहारमधील कारखान्यांकडून गाळप   हंगाम सुरू केला जातो. यंदा गाळप हंगाम पंधरा दिवसांनी उशिरा सुरू होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले अाहे.
 
उत्तर प्रदेशात दहा टक्क्यांनी वाढ
उत्तर प्रदेश साखर उत्पादनात अाघाडीवर अाहे. पीकक्षेत्रात झालेली वाढ अाणि पोषक वातावरणामुळे यंदा उत्पादन वाढणे अपेक्षित अाहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये ८.७७ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २०.५ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यंदा त्यात १०-१२ टक्क्यांनी वाढ होऊन पीकक्षेत्र २३ लाख हेक्टरवर पोचले अाहे, अशी माहिती उत्तर प्रदेश साखर अाणि ऊस विकास विभागाचे प्रधान सचिव संजय भोसरेड्डी यांनी दिली.यंदा वेळेवर पाऊस झाला. त्यामुळे ऊस पीक चांगले अाले अाहे. परिणामी उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला अाहे.

इतर अॅग्रो विशेष
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...