देशात साखरेच्या दरात सुधारणा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली ः दिवाळी सण तोंडावर असल्याने साखरेला मागणी वाढली अाहे. परिणामी दर वाढले अाहेत. ग्राहक व्यवहार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत साखरेचा घाऊक दर शनिवारी (ता. ७) प्रतिक्विंटल ४,०४० रुपयांवर पोचला.
मुंबईत साखरेच्या दरात चढ-उतार सुरू अाहे. मुंबईत साखरेचा दर शुक्रवारी (ता. ६) प्रतिक्विंटलमागे १५ रुपयांनी वाढून ३,९४० रुपयांवर पोचला होता. शनिवारी (ता. ७) त्यात काही प्रमाणात घट झाली.
चेन्नई येथेही साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,०५० रुपयांवर पोचला अाहे. पुढील काही दिवसांत साखरेला मागणी वाढल्यास दर वधारण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली अाहे.
वाहनांची कमतरता असल्याने वाहतूक खर्च वाढला अाहे. यामुळे मुंबईत साखरेच्या दरात वाढ होत अाहे, अशी माहिती मुंबईतील व्यापारी मुकेश कुवाडिया यांनी दिली अाहे.
भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) यंदाच्या हंगामात २५.१ दशलक्ष टन साखर उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला अाहे. महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणार अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com