agriculture news in marathi, Sugar production of 20 lakh quintals in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर उत्पादन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू असून, रविवारी (ता. १०) पहाटेपर्यंत या १४ कारखान्यांमधून एकूण २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सह्याद्री कारखान्याने साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखाने पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू आहेत. १४ कारखान्यांनी रविवारपर्यंत १९ लाख ५१ हजार ८१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १०.३९ टक्के साखर उतारा येत आहे.

सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू असून, रविवारी (ता. १०) पहाटेपर्यंत या १४ कारखान्यांमधून एकूण २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सह्याद्री कारखान्याने साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखाने पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू आहेत. १४ कारखान्यांनी रविवारपर्यंत १९ लाख ५१ हजार ८१९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे २० लाख २७ हजार ३६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १०.३९ टक्के साखर उतारा येत आहे.

जिल्ह्यात सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक दोन लाख ९० हजार ८०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ३५ हजार २९० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सह्याद्री कारखान्याची साखर उताऱ्यात आघाडी असून, या कारखान्याचा ११.५३ टक्के साखर उतारा आहे. साखर उताऱ्यात दुसरा क्रमांक जयवंत शुगरचा लागत असून, या कारखान्यांचा ११.२१ सरासरी साखर उतारा येत आहे.

जिल्ह्यात अजिंक्‍यतारा, कृष्णा, जयवंत, ग्रीन पॉवर, श्रीराम व न्यू फलटण या कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला आहे. उर्वरित कारखान्यांचा गाळप सुरू महिना उलटला असूनही ऊस बिले जमा जाहीर केलेले नाही. यामुळे या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यात अवस्थता निर्माण झाली आहे.

उद्दिष्टासाठी साखर उताऱ्यांकडे दुर्लक्ष
ऊस गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी सर्वच कारखान्यांची गाळपाची उद्दिष्टे ठरवून हंगामास सुरवात केली आहे. मागील हंगामात मोजक्‍याच कारखान्यांनी तीन हजार टप्पा ओलांडला आहे. मागील हंगामात कमी दर देणाऱ्या कारखान्यास ऊस देणास शेतकरी अनुत्सुक आहेत. यामुळे हे कारखाने उद्दिष्ट गाठण्यासाठी मिळेल तेथून ऊस आणत आहेत. याचा परिणाम साखर उताऱ्यावर होत असून, साखर उतारा कमी येत आहे. साखर उताऱ्यांची ही अवस्था राहिल्यास पर्यायाने कारखान्यांचा दर कमी होणार आहे. याचा परिणाम प्रामाणिक ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे.

इतर बातम्या
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
शेतकऱ्यांचा आंदोलनानंतर आत्मदहनाचा...राशीन, जि. नगर : कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते...सोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे...परभणी : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून...कोल्हापूर : येथील बाजार समितीत सौदे सुरू असताना...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत...बुलडाणा : कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...