agriculture news in marathi, Sugar production at 99 lakh quintals in Sangli | Agrowon

सांगलीत ९९ लाख क्विंटलवर साखर उत्पादन
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८२ लाख २७ हजार २६३ टन उसाचे गाळप केले. त्यातून ९९ लाख ८७ हजार ३५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी १२.१४ टक्के साखर उतारा मिळाला. सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उरकला असल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. त्यापैकी दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याला अवघ्या चार दिवसात हंगाम बंद करावा लागला. नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगरने जेमतेम केवळ दीड लाखाचे गाळप केले. त्यातून १४ लाख ९८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८२ लाख २७ हजार २६३ टन उसाचे गाळप केले. त्यातून ९९ लाख ८७ हजार ३५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी १२.१४ टक्के साखर उतारा मिळाला. सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उरकला असल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. त्यापैकी दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याला अवघ्या चार दिवसात हंगाम बंद करावा लागला. नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगरने जेमतेम केवळ दीड लाखाचे गाळप केले. त्यातून १४ लाख ९८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली साखर कारखान्यास दोन लाख टन ऊस गाळपाचा टप्पाही ओलांडता आला नाही. साखरेचे दर उतरल्याने थकीत एफआरपी न दिल्याने या कारखान्यांना वेळेत गाळप सुरू करता आले नाही. त्यामुळे गाळप कमी झाले असल्याचे चित्र आहे. 

राजारामबापू कारखान्याच्या साखराळे युनिटने विक्रमी १० लाख १४ हजार ७१९ टन उसाचे गाळप केले. १३ लाख ९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. गाळपाबरोबरच १२.९१ टक्के साखर उतारा घेऊन तोही विक्रम नोंदविल्याचे दिसते आहे. वसंतदादा साखर कारखान्यानेही प्रथमच आठ लाख ६५ हजार ९६३ टन उसाचे गाळप केले. त्यातून १० लाख १७ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

सोनहिरा, क्रांती, हुतात्मा या साखर कारखान्यांनी चांगले गाळप केले. यंदा जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गाळप स्थिती तितकी बरी राहिली नसल्याचे चित्र पहायला मिळाले. यंदाचा हंगाम सध्या उरकला आहे.  

टॅग्स

इतर बातम्या
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय...वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत...
नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी...नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर...
सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४...नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना...उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार...हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर...
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शनअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार...सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’...
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरासोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...