agriculture news in marathi, Sugar production to cross estimate by 12 percent | Agrowon

महाराष्ट्रातील वाढीव साखर उत्पादनामुळे गणित बिघडले
रॉयटर्स वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

यंदाच्या हंगामात (२०१७-१८) देशातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून २९२ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादनात दुपटीपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय व स्थानिक डीलर्सच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. 

यंदाच्या हंगामात (२०१७-१८) देशातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून २९२ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादनात दुपटीपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय व स्थानिक डीलर्सच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. 

अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन मिळणार असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठांत साखरेच्या दरावर दबाव येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकार साखरेच्या निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यातकर शून्यावर आणण्याचा निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे. साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे देशातील साखरेच्या उत्पादनातील घट किंवा वाढ हा घटक साखरेच्या जागतिक बाजारातील दरावर परिणाम करतो.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) यंदा साखरेचे उत्पादन २६१ लाख टन राहील असा अंदाज जानेवारी महिन्यात वर्तवला होता. परंतु महाराष्ट्रात साखरेच्या उत्पादनात भरीव वाढ होण्याची चिन्हे असल्याने हा अंदाज खोटा ठरेल, असे मुंबईतील एका ग्लोबल ट्रेडिंग हाउसशी संबंधित डीलरने सांगितले. 

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७ ट्रेडिंग हाउसच्या डीलर्सच्या म्हणण्यानुसार यंदा महाराष्ट्रात उसाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा चांगले राहिले. त्यामुळे सरकारने आधी वर्तवलेल्या ७३ लाख टन साखर उत्पादनाच्या अंदाजात बदल होऊन उत्पादन १०२ लाख टन राहील, अशी शक्यता आहे, असे या डीलर्सनी सांगितले. 

गेल्या हंगामात (२०१६-१७) देशात २०३ लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४२ लाख टन इतका होता. केंद्र सरकार यंदा साखरेचे उत्पादन २६० लाख टनांच्या अासपास राहील, असे गृहीत धरूनच धोरणांची आखणी करत होते; परंतु प्रत्यक्षात अतिरिक्त साखरेचे उत्पादन होणार असल्याचा मुद्दा सरकारने लक्षात घ्यायला हवा, असे नवी दिल्ली येथील एका डीलरने सांगितले. सरकारने निर्यातीला प्रोत्साहन दिल्याशिवाय स्थानिक बाजारांत साखरेचे दर वाढणार नाहीत, असे त्याने स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना उसाचे पैसे अदा करण्यासाठी साखर कारखान्यांनी साखर विक्रीचा धडाका लावला असून, गेल्या चार महिन्यांत स्थानिक बाजारातं साखरेचे दर ११ टक्क्यांनी घटले आहेत.

केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी महिनाभरापूर्वी साखरेच्या निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील दर देशांतर्गत बाजारपेठांतील दरापेक्षा कमी असल्यामुळे निर्यातशुल्क रद्द केल्यानंतरही साखर कारखाने साखरेची निर्यात करू शकणार नाहीत, असे मत वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले.

पाकिस्तानने अतिरिक्त साखर उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर निर्यातीला उठाव मिळावा, म्हणून अनुदान देण्याचे धोरण आक्रमकपणे राबविले. आधीचे पाच लाख टन साखरेसाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट वाढवून ते २० लाख टन इतके करण्यात आले. भारतानेही हाच कित्ता गिरवत साखरेच्या निर्यातीसाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात       आहे.

पाकिस्तानने साखर निर्यातीसाठी अनुदान सुरू केले आहे. भारतानेही त्या प्रकारचा निर्णय घेतला तरच साखरेच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होईल. केवळ निर्यात शुल्क रद्द करून भागणार नाही.
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...