agriculture news in Marathi, Sugar production increased by 82 lac tons, Maharashtra | Agrowon

देशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढले
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

कोल्हापूर: यंदाच्या हंगामात देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक साखर निर्मिती झाली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत  ९३.८३ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र अग्रेसर राहिले आहे.  देशात यंदाच्या हंगामात सगळीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात ८२.३६ लाख मेट्रीक टन साखरेचे जादा उत्पादन झाले आहे. 

कोल्हापूर: यंदाच्या हंगामात देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक साखर निर्मिती झाली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत  ९३.८३ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन घेत महाराष्ट्र अग्रेसर राहिले आहे.  देशात यंदाच्या हंगामात सगळीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात ८२.३६ लाख मेट्रीक टन साखरेचे जादा उत्पादन झाले आहे. 

साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तरप्रदेश ही राज्ये महत्त्वाची मानली जातात. देशाच्या एकूण उत्पादनापैकी किमान सत्तर टक्के साखर उत्पादन या तीन राज्यांतूनच होते. हंगाम सुरू होण्याअगोदर तीन महिन्यांपर्यंत देशात पावसाअभावी उसाची स्थिती खूपच बिकट होती. परंतु हंगाम सुरू होण्याअगोदर एक महिना देशात सर्वत्र विक्रमी पाऊस झाला. निर्यात शुल्क काढले असले तरी या घोषणेनंतर साखरेच्या दरात फारशी वाढ झाली नसल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. ज्या वेळी कारखाने निर्यात करण्यास सुरवात करतील त्याचवेळी दराचा फरक दिसून येऊ शकतो, अशी माहिती कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दिली. 

१०६ कारखान्यांची धुराडी थंडावली
साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा ५२३ साखर कारखान्यांनी आपला हंगाम सुरू केला. १५ मार्च अखेर १०६ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटपला आहे. बंद झालेल्या कारखान्यांमध्ये महाराष्टातील ३१, कर्नाटकातील ४८, उत्तरप्रदेशातील ५, तामिळनाडूतील ९, आंध्रप्रदेशातील ७ आणि अन्य राज्यांतील ७ कारखाने बंद झाले आहेत. 

महाराष्ट्र अग्रेसर
साखर उत्पादनात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा ९३.८३ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन केले आहे. उत्तरप्रदेशात ८४.३९ टन तर कर्नाटकात ३५.१० मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गुजरातमध्ये ९, बिहारमध्ये ५, पंजाबमध्ये ५ तर तामिळनाडूत ५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 

२० लाख टन निर्यातीची अपेक्षा
गेल्या हंगामात ४० लाख मेट्रीक टन साखर शिल्लक आहे. हा दबाव झुगारण्यासाठी यातील किमान २० लाख मेट्रीक टन साखर बाहेर गरजेचे आहे. तर पुढील हंगामात निर्माण होणारी ४० ते ५० लाख मेट्रीक टन साखर निर्यात झाली तरच साखर उद्योगाची घडी पुढील काही महिन्यांत नीट बसू शकेल असा अंदाज साखर तज्ज्ञांचा आहे.

१४ हजार कोटी थकबाकी
देशात पडलेले दर आणि साखर उद्योगासमोरील इतर समस्यांमुळे जानेवारी महिन्यापर्यंत देशातील साखर कारखान्यांकडे एकूण १४ हजार कोटींची देणी बाकी आहे. देशातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत २५.८० दशलक्ष टन साखर निर्मिती केली आहे. सर्वात जास्त साखर उत्पादन महाराष्ट्रात त्यानंतर उत्तप्रदेशात झाले आहे. सध्या दर उत्पादन खर्चाच्या ३५०० ते ३६०० रुपयांपेक्षा कमी असल्याने कारखान्यांना सध्या तोटा सहन करावा लागत आहे.

इतर अॅग्रोमनी
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...