Agriculture News in Marathi, Sugar production, India | Agrowon

दीड महिन्यात तेरा लाख टन साखर उत्पादन
वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली ः देशातील बहुतांश साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर ऊस गाळप सुरू केले अाहे. यामुळे साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मिळाले अाहे. अाॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गाळप हंगामात पहिल्या ४५ दिवसांत कारखान्यांनी १३.७५ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.६७ लाख टन साखर उत्पादन घेतले होते, अशी माहिती भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) दिली अाहे.

नवी दिल्ली ः देशातील बहुतांश साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर ऊस गाळप सुरू केले अाहे. यामुळे साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मिळाले अाहे. अाॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गाळप हंगामात पहिल्या ४५ दिवसांत कारखान्यांनी १३.७५ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.६७ लाख टन साखर उत्पादन घेतले होते, अशी माहिती भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) दिली अाहे.

अातापर्यंत देशातील ३१३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २२२ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. उत्तर प्रदेश अाणि महाराष्ट्रातील कारखाने साखर उत्पादन घेण्यात अाघाडीवर अाहेत.

उत्तर प्रदेशातील ७८ कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत ५.६७ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक अाहे. महाराष्ट्रातील १३७ कारखान्यांनी ३.२६ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९५ कारखान्यांनी १.९२ लाख टन उत्पादन घेतले होते, असे ‘इस्मा’ने म्हटले अाहे.

साखर उत्पादनात देशात तिसऱ्या क्रमाकांवर असलेल्या कर्नाटकातील कारखान्यांनी हंगामाच्या पहिल्या ४५ दिवसांत गेल्या वर्षी एवढेच साखर उत्पादन घेतले अाहे.
दरम्यान, देशात मार्च ते सप्टेंबरदरम्यान साखरेचे दर स्थिर राहिले अाहेत. मात्र, नवीन हंगामातील साखर बाजारात अाल्यानंतर जुनी साखर सवलतीच्या दरात विकण्यात अाली. त्यामुळे दर प्रतिक्विंटल १००-२०० रुपयांनी घसरून सरासरी ३६०० रुपयांपर्यंत खाली अाले अाले, असेही नमूद सांगण्यात अाले अाहे.

साखरेच्या विक्रीत सुधारणेची गरज
सप्टेंबर अाणि अाॅक्टोबरमधील सणांमुळे साखर विक्रीत वाढ झाली. मात्र तरीही कारखान्यांकडील साखरेचा उठाव कमीच राहिला. गेल्या दोन महिन्यांत कारखान्यांकडील ४१ लाख टन साखरेची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ४२ लाख टन साखरेची विक्री झाली होती. देशात यंदाच्या हंगामात अधिक साखर उत्पादन होण्याचा अंदाज अाहे. या पार्श्वभूमीवर साखरेच्या विक्रीत सुधारणा अाणि दर स्थिर राहण्याची गरज अाहे, असे ‘इस्मा’ने नमूद केले अाहे.

‘स्टॉक लिमिट’ काढून टाकण्याची मागणी
साखरेच्या साठवणुकीवर मर्यादा (स्टॉक लिमिट) घालण्याच्या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात अाली अाहे. साखरेचे दर नियंत्रणात राहावेत, या उद्देशाने केंद्र सरकारने व्यापाऱ्यांकडील साखरेच्या साठवणुकीवर २८ अाॅक्टोबरपर्यंत मर्यादा घातली होती. ३१ डिसेंबरपर्यंत साखरेच्या साठवणुकीवरील मर्यादा कायम ठेवण्यात अाली अाहे.

त्यात यंदा अतिरिक्त साखर उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने सरकारने साखरेवरील स्टॉक लिमिट तत्काळ काढून टाकावे, अशी मागणी ‘इस्मा’ने केंद्र सरकारकडे केली अाहे. गेल्या काही दिवसांत साखरेचा अपेक्षित उठाव झालेला नाही, असा दावा करण्यात अाला अाहे.

इतर अॅग्रोमनी
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...