Agriculture News in Marathi, sugar production India, ISMA report | Agrowon

साखर उत्पादन ३९ लाख टनांवर
वृत्तसेवा
शनिवार, 9 डिसेंबर 2017

नवी दिल्ली  ः देशात ऊस गाळप हंगामाने वेग घेतला अाहे. अाॅक्टोबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या गाळप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत ३९.५१ लाख टन साखर उत्पादन घेण्यात अाले अाहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी अधिक अाहे, अशी माहिती भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) दिली अाहे.

नवी दिल्ली  ः देशात ऊस गाळप हंगामाने वेग घेतला अाहे. अाॅक्टोबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या गाळप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत ३९.५१ लाख टन साखर उत्पादन घेण्यात अाले अाहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी अधिक अाहे, अशी माहिती भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) दिली अाहे.

यंदा (२०१७-१८) देशात २५१ लाख टन टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी साखर उत्पादन २०२ लाख टनांपर्यंत खाली अाले होते. यंदा उसाची उपलब्धतता अधिक असल्याने साखर उत्पादन वाढीचे संकेत देण्यात अाले अाहेत. अाॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यानच्या काळात ३९.५१ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत कारखान्यांनी २७.८२ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. नोव्हेंबरपर्यंत देशातील ४४३ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत ३९३ कारखाने सुरू होते. यंदा ऊस गाळप हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांनी संख्या अधिक अाहे.

उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी नोव्हेंबरपर्यंत १३.५९ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत येथील कारखान्यांनी ८.४८ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. महाराष्ट्रातील कारखान्यांच्या साखर उत्पादनात वाढ झाली अाहे. येथील कारखान्यांनी नोव्हेंबरपर्यंत १४.९० लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी येथील कारखान्यांनी ९.४२ लाख लीटर साखर उत्पादन घेतले होते.

कर्नाटकातील कारखान्यांनी ६.८२ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गुजरातमधील कारखान्यांनी १.८० लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी येथील कारखान्यांनी १.४२ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. देशातील इतर कारखान्यांनी २.४० लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी लवकर गाळप सुरू केले. यामुळे येथील कारखान्यांनी अधिक साखर उत्पादन घेतले अाहे, अशी माहिती ‘इस्मा’ने दिली अाहे.

देशात ४२ लाख टन साखरसाठा शिल्लक राहणार
गेल्या वर्षी देशातील साखर उत्पादनात घट झाली होती. यंदाच्या हंगामाच्या सुरवातीला ३८.७६ लाख टन साखरसाठा शिल्लक होता. गेल्या काही वर्षांतील हा नीचांकी साखरसाठा अाहे. शिल्लक साठा अाणि यंदाचे उत्पादन मिळून देशात एकूण २९२.६१ लाख टन साखरेचा पुरवठा राहील.

तर देशांतर्गत साखरेचा वापर २५०-२५२ लाख टन राहील. तर ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत देशात ४०-४२ लाख टन साखरसाठा शिल्लक राहील, असा अंदाज इस्माने व्यक्त केला अाहे.

नोव्हेंबरपर्यंतचे राज्यनिहाय साखर उत्पादन (लाख टनांमध्ये)

 
राज्य सुरू कारखान्यांची संख्या उत्पादन
महाराष्ट्र १७० १४.९०
उत्तर प्रदेश ११० १३.५९
कर्नाटक ६० ६.८२
गुजरात १७ १.८०

स्रोत ः इस्मा

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...
कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती सुरूचजळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन...
एकात्मिक पीक पद्धतीत रेशीमचे स्थान अढळजालना : रेशीम उद्योगातील देशांतर्गत संधी पाहता...
शेळीपालनात शास्त्रोक्‍त पद्धतीकडे वळाजालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव...
मक्यावरील करपा रोगाच्या जनुकांचा घेतला...मक्यावरील करपा रोगाला प्रतिकार करणाऱ्या जनुकांचा...
वृद्धापकाळातील नाजूकपणा कमी करण्यात...मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या,...
बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडलेबुलडाणा : विदर्भ-मराठवाडा-खानदेशला जोडणाऱ्या...
मोहराने बहरल्या काजूच्या बागासिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील...
पुणे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ६६४१ कामे... पुणे ः भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १०१ टक्के पेरणी सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची...
डाळिंबाला द्या काटेकोर पाणीडाळिंब या पिकाला पाण्याची गरज ही मुळातच खूप कमी...
सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची...सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख...
माथाडी मंडळे बंद करणे हा आत्मघाती प्रकार पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस...
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरुन...मुंबई : नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित...
थकीत ‘एफआरपी’ची रक्कम तत्काळ द्या :...पुणे : थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ देणे, को २६५...
‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय...अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या...
अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर...द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या...
अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...