भारतात साखरेचे उत्पादन वाढणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली ः भारतातील कच्च्या साखरेचे उत्पादन यंदाच्या (२०१७-१८) हंगामात २५ टक्क्यांनी वाढून २७.७ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला अाहे.
 
तसेच पांढऱ्या साखरेचे उत्पादन २५.२ दशलक्ष टन होईल. गेल्या वर्षी या साखरेचे उत्पादन २०.२ दशलक्ष टन झाले होते, असेही ‘यूएसडीए’ने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले अाहे.
 
विशेषतः भारतातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक अादी प्रमुख ऊस उत्पादक राज्यांत साखर उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे. उत्तर प्रदेशातून सर्वाधिक साखर उत्पादन अपेक्षित अाहे. या ठिकाणी यंदा होणारे साखर उत्पादन हे गेल्या दशकातील सर्वाधिक असेल.
 
यंदा साखरेचा उतारा सरासरी ११.२ टक्के राहील. गेल्या वर्षी सरासरी ११ टक्के साखर उतारा मिळाला होता. दुष्काळामुळे गेल्या वर्षी उत्पादन कमी झाले होते. मात्र यंदा पश्चिम अाणि दक्षिण भारतातील राज्यांत ऊस उत्पादन वाढणार असल्याचे संकेत दिले अाहेत.
 
भारतात साखरेचा वापर २४.१ दशलक्ष टन राहील. गेल्या वर्षी हे प्रमाण २३.४ दशलक्ष टन होते. तसेच भारतात यंदा १.५ दशलक्ष टन साखरेची अायात होईल. अागाऊ परवाना योजनेअंतर्गत १.२ दशलक्ष टन कच्ची साखर अाणि २५ टक्के अायात शुल्काने ३ लाख टन साखर अायात होणार अाहे, असे ‘यूएसडीए’ने अंदाज अहवालात म्हटले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com