agriculture news in Marathi, Sugar rate declined by 100 rupees, Maharashtra | Agrowon

साखर १०० रुपयांनी उतरली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी साखरेचे वाढलेले दर पुन्हा शंभर रुपयांनी खाली आल्याने कारखानदारांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्य बॅंकेकडून वाढलेल्या मूल्यांकनानुसार कर्ज मिळण्याअगोदरच किमती कमी होऊ नयेत, अशी अपेक्षा कारखानदार करीत आहेत. 

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी साखरेचे वाढलेले दर पुन्हा शंभर रुपयांनी खाली आल्याने कारखानदारांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्य बॅंकेकडून वाढलेल्या मूल्यांकनानुसार कर्ज मिळण्याअगोदरच किमती कमी होऊ नयेत, अशी अपेक्षा कारखानदार करीत आहेत. 

साखरेच्या घसरत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्राने आयात शुल्क शंभर टक्के केले होते. यामुळे साखरेच्या दरात क्विंटलला चारशे रुपयांनी वाढ झाली होती. किमती ३२०० रुपयांपर्यंत वाढल्या होत्या; पण त्यानंतर पुन्हा साखरेच्या दरात सरासरी १०० रुपयांची घसरण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. साखर दर ३५०० च्या वर जावून स्थिर राहिल्यास कारखाने तातडीने पहिला हप्ता देतील, अशी शक्‍यता कारखानदारांनी व्यक्त केली. 

साखरेचे दर वाढल्यानंतर कारखान्यांनी तातडीने साखर विक्री करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेकांनी साखर विक्रीसाठी टेंडर काढले. तीन ते चार दिवस ३१०० ते ३२०० रुपयांपर्यंतचा दर कारखान्यांना मिळाला; पण त्यानंतर मात्र पुन्हा १०० रुपयांची घसरण होऊन हे दर ३००० रुपयांपर्यंत आले. यामुळे कारखान्यांची पुन्हा पंचाइत झाली.

एका कारखाना प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘साखरेचे दर उतरले की राज्य बॅंक तातडीने त्याचे मूल्यांकन करून वाढविलेला दर पुन्हा खाली आणू शकते. ही बाब कारखान्यांना परवडणारी नाही. यामुळे उच्चांकी पातळीवर दर जाऊन ते स्थिर होण्यासाठी सरकारने पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’ 

कारखाने हप्त्यात बदल करणार?
गेल्या सप्ताहात साखर दरात वाढ झाल्याने काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी ठरलेला ३००० रुपयांपर्यंतचा हप्ता नक्की देऊ असे जाहीर केले आहे. हा हंगाम संपायच्या आत जाहीर केलेला पहिला हप्ता देण्याबाबत आम्ही सकारात्मक विचार करत असल्याचे काही कारखानदारांनी सागितले. मात्र कारखान्यांमध्ये ठरलेला हप्ता देण्याबाबत अद्यापही एकमत होत नसल्याचेही चित्र सध्या कारखाना वर्तुळात आहे.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...