agriculture news in Marathi, sugar rate down in Market, Maharashtra | Agrowon

दरामुळे साखरेचा रंग फिका
राजकुमार चौगुले
शुक्रवार, 22 मार्च 2019

कोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही साखर उद्योगाचे शुक्‍लकाष्ठ संपत नसल्याची स्थिती आहे. शासनाने किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० रुपये केल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्याने साखर उद्योगाचे अडचणीचे फेरे कायम आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना साखरेची मागणीच रोडावल्याने कारखान्यांचे साखर विक्रीचे महिन्याचे कोटे वाया जात आहेत. 

गेल्या दोन महिन्यांत एकूण कोट्याच्या केवळ पंचवीस ते तीस टक्के इतकीच साखर विकली जात आहे. शिल्लक साखरेमुळे बॅंकेच्या व्याजाचा भुर्दंड मात्र कारखान्यांवर बसत असल्याने यंदा हंगामाची सांगता निराशेतच होणार आहे. 

कोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही साखर उद्योगाचे शुक्‍लकाष्ठ संपत नसल्याची स्थिती आहे. शासनाने किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० रुपये केल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्याने साखर उद्योगाचे अडचणीचे फेरे कायम आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना साखरेची मागणीच रोडावल्याने कारखान्यांचे साखर विक्रीचे महिन्याचे कोटे वाया जात आहेत. 

गेल्या दोन महिन्यांत एकूण कोट्याच्या केवळ पंचवीस ते तीस टक्के इतकीच साखर विकली जात आहे. शिल्लक साखरेमुळे बॅंकेच्या व्याजाचा भुर्दंड मात्र कारखान्यांवर बसत असल्याने यंदा हंगामाची सांगता निराशेतच होणार आहे. 

व्यापाऱ्यांची चतुराई 
साखर ३१०० रुपये होणार असा अंदाज आल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेची खरेदी केली होती. दोन महिन्यांपूर्वी साखरेची किमान विक्रीची किंमत शासनाने वाढविली. प्रत्यक्ष आदेश येइपर्यंत अनेक व्यापाऱ्यांनी साखर कारखान्यांकडून खरेदी करून ठेवली.

काही कारखान्यांनी साखरेचा उठाव होत असल्याने जुन्या दरातच साखर विक्रीला प्राधान्य दिले. परंतू ज्या वेळी हे आदेश आले, त्या वेळेपासून मात्र साखरेची मागणी घसरली. बाजारात साखर उपलब्ध असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी साखरेची खरेदी करण्यास नकार दिला. यामुळे कारखानदारांचे धाबे दणाणले. आता जुन्या दराने खरेदी केलेली साखर बाजारात आणून त्याची विक्री सुरू असल्याने साखर कारखान्यांकडील साखरेच्या मागणीला फटका बसत आहे.

यामुळे कारखानदारात हंगाम संपतानाच अस्वस्थता पसरली आहे. एफआरपी देऊन मोकळे झालेल्या कारखान्यांपुढे मात्र हंगामात शेवटी शेवटी उसाचे गाळप झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम कशी भागवायची याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मागणी वाढेल या अपेक्षेत असणाऱ्या कारखानदारांची घोर निराशा झाली आहे. फेब्रुवारी व मार्च मध्ये जितक्‍या साखरेचा उठाव व्हायला हवा होता तितका झाला नसल्याने आता शिल्लक साखरेचे संकट कारखान्यांपुढे घोंघावू लागले आहे. 

कारखान्यांची केंद्राकडे धाव 
साखर विक्री नसल्याने एफआरपीची उर्वरित रक्कम देऊच शकत नसल्याचे कारखानदारांनी सांगितले. तसेच बॅंका कर्ज देण्यास नकार देत असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे केंद्र शासनाची मदत घेण्यासाठी कारखाने प्रयत्नशील आहेत. मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांमार्फत केंद्राकडे देण्यासाठी कारखानदारांची पळापळ सुरू असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली.

बॅलन्स शीटचा गोंधळ 
नव्या दराने साखर खरेदी करताना टेंडर जरी क्विंटलला ३१०० रुपयांचे निघाले तरी कारखान्यांना ३००० रुपयांप्रमाणेच रक्कम व्यापाऱ्यांनी दिली आहे. वरचे १०० रुपये डिपॉझिट म्हणून ठेवून घेतल्याने कारखान्यांच्या बॅलन्स शीटवर ३००० रुपयांनी साखर विक्री दिसत असल्याचे काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. यामुळे ही साखर कमी दराने कारखान्यांनी विकली असा गैरसमज निर्माण होत असल्याचा समज होत आहे. मुळातच व्यापारी चतुराईमुळेच सध्या साखरेच्या बाजारात मंदीचे वातावरण तयार होत असल्याचे कारखानदारांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...