agriculture news in Marathi, sugar rates increased due to export decision, Maharashtra | Agrowon

निर्यात परवानगीने साखरेच्या दरात सुधारणा
राजकुमार चौगुले
सोमवार, 2 एप्रिल 2018

कोल्हापूर ः केंद्राने साखर निर्यात करण्याबाबत कारखान्यांना निर्देश देताच दिल्ली येथील बाजारात साखरेच्या दरात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत क्विंटलला १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. केंद्राच्या घोषणेनंतर घाऊक बाजारात असलेल्या मंदीचे वातावरण काही प्रमाणात ओसरले. याचा परिणाम साखरेचे दर वाढण्यावर झाला आहे.  

कोल्हापूर ः केंद्राने साखर निर्यात करण्याबाबत कारखान्यांना निर्देश देताच दिल्ली येथील बाजारात साखरेच्या दरात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत क्विंटलला १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. केंद्राच्या घोषणेनंतर घाऊक बाजारात असलेल्या मंदीचे वातावरण काही प्रमाणात ओसरले. याचा परिणाम साखरेचे दर वाढण्यावर झाला आहे.  

शासन निर्यातीबाबतच्या निर्णयात दिरंगाई करत असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम साखरेच्या बाजारावर झाला होता. यामुळे साखरेचा बाजार मंदीत होता. परिणामी, साखर कारखानदार अस्वस्थ होते. बुधवारी (ता. २८) याबाबतचा निर्णय झाल्यानंतर साखर बाजारात तेजीचा अनुभव येण्यास प्रारंभ झाला. एम. ३० आणि एस. ३० या दोन्ही प्रकारच्या साखरेची किंमत सुमारे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढली. ३० मार्चला एम. ३० चा दर क्विंटलला ३३०० ते ३३९०, तर एस. ३० साखरेचा दर ३२९० ते ३३८० रुपये इतका झाली. शनिवारी (ता.३१) पर्यंत सध्या याच किमती टिकून आहेत. 

सध्या उन्हाळा असल्याने सॉफ्टड्रिंक आणि आइस्क्रीम उद्योगासाठी साखरेची मागणी सातत्याने आहे. यामुळे सध्या तरी स्थानिक बाजारात मागणी चांगली राहण्याची शक्‍यता सूत्रांची आहे. पुढील महिनाभर या दोन उद्योगासाठी साखरेची मागणी कायम राहील. यामुळे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे. 

साखर कारखाना पातळीवर अजून अंदाजच सुरू 
केंद्राने निर्यातीचे उद्दिष्ट दिले असले तरी कारखान्यंनी अजूनही अंदाज घेणेच सुुरू ठेवले आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे बहुतांशी साखर हंगाम संपल्यानंतरच म्हणजे एप्रिलच्या मध्यापासूनच निर्यात होईल अशी शक्‍यता आहे. पण साखर निर्यात करताना बॅंकांच्या कर्जाचे हप्ते, स्थानिक बाजारापेक्षा कमी दरात साखर विकावी लागणार असल्याने तयार होणारे शॉर्टमार्जिन याचाच अंदाज कारखाने घेत आहेत. प्रत्येक टनामागे सहाशे ते सातशे रुपयांचा तोटा सहन करून साखर बाहेर पाठवावी लागणार आहे. यामुळे अद्यापही कारखाना स्तरावरून एप्रिलच्या मध्यापर्यंत पूर्ण क्षमतेने निर्यात होईल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असल्याने कारखान्यांत निर्माण होणाऱ्या साखरेचा अंदाज घेऊनच साखर निर्यातीबाबत कारखाने विचार करतील असे वातावरण सध्या कारखाना वर्तुळात आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...