agriculture news in marathi, sugar rise by 3.5 percent | Agrowon

साखरेच्या दरात ३.५ टक्के वाढ
वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

केंद्र सरकारने साखर कारखान्यांना जुलै महिन्यात  साखर विक्रीसाठी अपेक्षेपेक्षा कमी कोटा जाहीर केल्यामुळे वाशी बाजारपेठेत साखरेच्या दरात साडे तीन टक्के वाढ झाली. सरकारने कारखान्यांना जुलै महिन्यासाठी १६ लाख टन साखर विक्रीची परवानगी दिली आहे. वास्तविक हे प्रमाण २० लाख टनापेक्षा अधिक राहील असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. जून महिन्यात २१ लाख टन साखर विकण्यास परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यासाठी कमी कोटा जाहीर झाल्याने पुरवठ्यात घट होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून हजर बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

केंद्र सरकारने साखर कारखान्यांना जुलै महिन्यात  साखर विक्रीसाठी अपेक्षेपेक्षा कमी कोटा जाहीर केल्यामुळे वाशी बाजारपेठेत साखरेच्या दरात साडे तीन टक्के वाढ झाली. सरकारने कारखान्यांना जुलै महिन्यासाठी १६ लाख टन साखर विक्रीची परवानगी दिली आहे. वास्तविक हे प्रमाण २० लाख टनापेक्षा अधिक राहील असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. जून महिन्यात २१ लाख टन साखर विकण्यास परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यासाठी कमी कोटा जाहीर झाल्याने पुरवठ्यात घट होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून हजर बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

वाशी बाजारसमितीत एस-३० साखरेच्या दरात प्रति क्विंटल १०० रूपयांची वाढ होऊन ते प्रति क्विंटल ३०२० ते ३०७० रूपयांपर्यंत पोहोचले. गेल्या काही महिन्यांत साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.   
दरम्यान, केंद्र सरकारने साखरेच्या संरक्षित साठ्यासाठी (बफर स्टॉक) देशातील पाचशे साखर कारखान्यांना कोटा ठरवून दिला आहे. देशातील विक्रमी साखर उत्पादन आणि स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळलेले दर यामुळे साखर उद्योग संकटात सापडला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत. 

या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ३० लाख टन साखरेचा संरक्षित साठा करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक कारखाना किती साखर संरक्षित साठा म्हणून ठेवू शकेल, याचा कोटा एका आदेशान्वये ठरवून देण्यात आला आहे. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या साखर व वनस्पतजीन्य तेल संचालनालयाने हा आदेश काढला आहे. 

महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी गळीत हंगामात ऊस लागवडीखालील क्षेत्रात २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. आजारी कारखान्यांना पुनरुज्जीवित करून आगामी हंगामात जास्तीत जास्त कारखाने गाळप करतील, यावर भर देणार असल्याचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले. 

इतर अॅग्रोमनी
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...