agriculture news in marathi, Sugar sess issue in law ministries court | Agrowon

साखरेच्या उपकराचा चेंडू कायदा मंत्रालयाच्या कोर्टात
सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

नवी दिल्ली : साखरेवर उपकर आकारणीच्या प्रस्तावावर पेच वाढला असून, याबाबत नेमलेल्या मंत्रिगटाने आता कायदा मंत्रालयाचा सल्ला घेण्याचे ठरविले आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायद्यात केवळ चैनीच्या वस्तूंवरच उपकर आकारण्याची तरतूद असून, यातून जमा होणारी रक्कम राज्यांना होणाऱ्या महसूल हानीच्या भरपाईसाठी मिळणार आहे. असे असताना साखरेवर उपकर कसा आकारता येईल हा तांत्रिक प्रश्‍न मंत्रिगटापुढे आहे.

नवी दिल्ली : साखरेवर उपकर आकारणीच्या प्रस्तावावर पेच वाढला असून, याबाबत नेमलेल्या मंत्रिगटाने आता कायदा मंत्रालयाचा सल्ला घेण्याचे ठरविले आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायद्यात केवळ चैनीच्या वस्तूंवरच उपकर आकारण्याची तरतूद असून, यातून जमा होणारी रक्कम राज्यांना होणाऱ्या महसूल हानीच्या भरपाईसाठी मिळणार आहे. असे असताना साखरेवर उपकर कसा आकारता येईल हा तांत्रिक प्रश्‍न मंत्रिगटापुढे आहे.

साखरेवर उपकर आकारणीनंतर जमा होणाऱ्या रकमेतून ऊस उत्पादकांची थकबाकी चुकते करणे सोईचे होईल असे सरकारचे म्हणणे आहे. ही रक्कम सुमारे 6700 कोटी रुपये असेल, असा सरकारचा अंदाज आहे. याआधीच सरकारने ऊस उत्पादकांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये अंशदान दिले आहे. इथेनॉलवरील जीएसटी पाच टक्‍क्‍यांवर आणण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, उपकर आकारणीचा लाभ फक्त निवडक राज्यांनाच होईल, असा आक्षेप काही राज्यांचा आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये साखरेवरील उपकराच्या प्रस्तावाला पश्‍चिम बंगाल, केरळ आदी राज्यांकडून झालेल्या विरोधानंतर यावर निर्णयासाठी पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा गट नेमला होता. या मंत्रिगटाची सोमवारी (ता.१४) बैठक होऊन त्यात कायदा मंत्रालयाचा सल्ला घेण्याचे ठरले.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...