agriculture news in marathi, sugar stock limit decision hikes prices | Agrowon

साखर विक्री बंधनाने दरात वाढ शक्य
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : केंद्राने घसरत्या साखर किमती रोखण्याकरिता कारखान्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पूर्ण क्षमतेने साखर विक्री करण्यावर बंदी घातली आहे. फेब्रुवारीत १७ व मार्च मध्ये केवळ १४ टक्के साखर विक्री करणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे काही काळ तरी साखरेच्या किमती वाढू शकतील, अशी शक्यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. मात्र, किंमत वाढली तरी पूर्ण हंगामाचा कमी दराचा ताण मात्र लगेच दूर होणे अशक्य असल्याचेही कारखानदारांचे म्हणणे आहे.

कोल्हापूर : केंद्राने घसरत्या साखर किमती रोखण्याकरिता कारखान्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पूर्ण क्षमतेने साखर विक्री करण्यावर बंदी घातली आहे. फेब्रुवारीत १७ व मार्च मध्ये केवळ १४ टक्के साखर विक्री करणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे काही काळ तरी साखरेच्या किमती वाढू शकतील, अशी शक्यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. मात्र, किंमत वाढली तरी पूर्ण हंगामाचा कमी दराचा ताण मात्र लगेच दूर होणे अशक्य असल्याचेही कारखानदारांचे म्हणणे आहे.

केंद्राने गेल्या चार दिवसांत अनेक दिलासादायक निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. पहिल्यांदा आयात शुल्क १०० टक्के केले. आता कारखान्यावर विक्रीचे बंधन घातले. यामुळे बाजारपेठेत साखरेची आवक मर्यादित राहून दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी केंद्राने तातडीने हे निर्णय अंमलबजावणीत आणावेत, अशीच अपेक्षा या उद्योगाची आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला या निर्णयाचा काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल असा अंदाज आहे.

साखर दरात १०० रुपयांची वाढ
केंद्र सरकारने आयात शुल्क १०० टक्के केल्या केल्या साखरेच्या दरात गेल्या दोन दिवसांत क्विंटलला १०० रुपयांनी वाढ झाल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. २९५० पर्यंत घसरलेला साखर दर शुक्रवारी ३३८५ रुपयांपेक्षा जास्त झाल्याचेे कारखाना सूत्रांनी सांगितले. साखर कारखान्याच्या साखर विक्रीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत साखरेचे बाजारभाव काही अंशी सुधारून स्थिर होतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

प्रतिक्रिया...
निर्णय चांगला असला तरी साखरेच्या दरात नेमकी किती वाढ होईल हे आताच सांगता येणार नाही. दोन महिन्यांत दर चांगले वाढल्यास कारखान्यांना पहिला हप्ता देणे सुसह्य होईल.
- गणपतराव पाटील,
अध्यक्ष, दत्त साखर कारखाना शिरोळ
...
कारखान्यांना विक्रीचे बंधन शासनाने पहिल्यांदाच घातले आहे. याची योग्य अंमलबजावणी झाल्यास ते कारखान्यांना फायदेशीरच ठरेल.
- अरुण लाड,
क्रांती साखर कारखाना, कुंडल
...
अशाच निर्णयाची अपेक्षा शासनाकडून होती. याचा सकारात्मक परिणाम निश्चितच साखर दरवाढीवर होऊन हा निर्णय साखर उद्योगाला फायदेशीर होऊ शकेल.
- पी. जी. मेढे,
साखर तज्ज्ञ, कोल्हापूर

 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...