साखर मूल्यांकन पुन्हा घटविले

साखर
साखर

कोल्हापूर : केंद्राने निर्यातीला अनुदान आणि कोटा ठरवूनही त्याचा परिणाम झाला नाही. त्यातच राज्य सहकारी बॅंकेने मंगळवारी (ता. १०) साखर मुल्यांकनात पुन्हा १२० रुपये कपात केली. नव्या दरानुसार क्विंटलला २८०० रुपये किंमत गृहीत धरल्याचे पत्र राज्य सहकारी बॅंकेने कारखान्यांना पाठविल्याने उद्योगात चिंतेचे वातावरण आहे.  गेल्या आठ दिवसांत साखरेच्या मूल्यांकनात तब्बल ३०० रुपयांची घट आहे. साखर दरात तातडीने वाढ झाली नाही, तर ज्या कारखान्यांची शेतकऱ्यांची देणी थकबाकीत आहेत, त्यातील एक रुपयाही उत्पादकांना आता तरी देणे शक्‍य नसल्याची भीती कारखानदारांनी व्यक्त केली, यामुळे आता उत्पादकाला शिल्लक पहिल्या हप्त्यासाठी झगडावे लागण्याची शक्‍यता आहे. साखरेच्या दरात घसरण होत असल्याने राज्य बॅंकेने ४ एप्रिलला साखरेचे मूल्यांकन कमी केले होते. यानुसार २९२० रुपये इतकी गृहीत धरण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या शिल्लक हप्त्यासाठी या रकमेची जुळवाजुळव करत असतानाच आठवड्याच्या आतच मंगळवारी (ता. १०) सलग दुसरा दणका कारखान्यांना बसला. ४ तारखेच्या मूल्यांकनाबाबतचा आदेश राज्य बॅंकेने तातडीने रद्द करीत मूल्यांकन २८०० रुपये केल्याचे पत्र कारखान्यांना दिले. यामुळे ८५ टक्के उचल सूत्रानुसार आता कारखान्यांना साखर पोत्यावर २३८० रुपये इतकी उचल मिळणार आहे. यातून प्रक्रिया खर्च वजा जाता कारखान्यांच्या हातात पहिल्या हप्त्यासाठी केवळ १६३० रुपये इतकीच रक्कम कारखान्यांना मिळणार आहे. यामुळे फार मोठा दुरावा (शार्ट मार्जिन) निर्माण होण्याची शक्‍यता आहे.  निर्यातीबाबतीत शुकशुकाटच केंद्राने निर्यातीचा कोटा ठरवून दिला असला, तरी गेल्या पंधरा दिवसांत किती कारखान्यांनी साखर निर्यात केली, याबाबतचा तपशील अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर सरासरी २१०० रुपये इतके आहेत. क्विंटलमागे सातशे ते आठशे रुपये तोटा सहन करणे कारखान्यांना अशक्‍य असल्याने कारखान्यांनी अद्यापही वेट अँड वॉचचीच भूमिका घेतली आहे. 

राष्ट्रीय बाजारातही मंदीचे वातावरण कायम साखर व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक बाजारातही साखरेचे दर ३००० रुपयापर्यंत खाली आहेत. आठच दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शीतपेये व आईस्क्रीम उत्पादकांनी चांगली खरेदी केल्याने दरात शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाली होती. पण ही वाढ तत्कालिक ठरल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com