साखर मूल्यांकनात १०० रुपयांनी वाढ

साखर मूल्यांकनात  १०० रुपयांनी वाढ
साखर मूल्यांकनात १०० रुपयांनी वाढ

कोल्हापूर : साखरेच्या वाढत्या दरामुळे राज्य बॅंकेनेही आपले मूल्यांकन वाढविले आहे. यापूर्वीच्या ३००० रुपये दरात आणखी १०० रुपयांची वाढ करून हा दर ३१०० रुपये करण्यात आला आहे.  नव्या हिशेबानुसार कारखान्यांना साखरेला प्रतिक्विंटल २६३५ रुपये इतका दर मिळणार आहे. येणाऱ्या गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य बॅंकेने मूल्यांकनात वाढ झाल्याने साखर कारखान्यांत काहीसे समाधानाचे वातावरण पसरले आहे. प्रक्रिया खर्च वजा जाता कारखान्यांना उसाच्या हप्त्यासाठी १८८५ रुपये बॅंकेकडून उपलब्ध होणार आहेत.  राज्य बॅंकेने गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर गृहीत धरून दोन वेळा साखरेच्या मूल्यांकनात वाढ केली. याचा फायदा कारखान्यांना बॅंकेकडून उचल घेताना होणार असल्याने पुढील हंगामात पहिला हप्ता देणे काहीसे सुखकर होईल, अशी माहिती कारखाना प्रतिनिधींनी दिली. ७ जूनला २९०० रुपये दर गृहीत धरण्यात आला होता. यानंतर तब्बल दोन महिन्यांनी १३ ऑगस्टला १०० रुपयांची वाढ केली. यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीतच जलद हालचाली करीत पुन्हा ३१ ऑगस्टला यात १०० रुपयांची वाढ करून ३१०० रुपये मूल्यांकन गृहीत धरण्यात आले. यामुळे कारखाने शॉर्टमार्जिनमधून बाहेर येण्याच्या प्रयत्नाला बळ मिळण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com