agriculture news in marathi, Sugar will low towards 2500 Rs warns Sharad Pawar | Agrowon

साखर २५०० रुपयांपर्यंत घसरेल : शरद पवार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

बारामती, जि. पुणे : देशात उसाचे उत्पादन खूप व भावात मात्र जागतिक बाजारपेठेपर्यंत घसरण झालेली आहे, आता साखरेचे दर २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही खाली घसरण्याची चिन्हे आहेत, अशा वेळी केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी देण्यासारखीही स्थिती उरणार नाही, त्यावर वेळीच पावले उचलली पाहिजेत, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. 

बारामती, जि. पुणे : देशात उसाचे उत्पादन खूप व भावात मात्र जागतिक बाजारपेठेपर्यंत घसरण झालेली आहे, आता साखरेचे दर २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही खाली घसरण्याची चिन्हे आहेत, अशा वेळी केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी देण्यासारखीही स्थिती उरणार नाही, त्यावर वेळीच पावले उचलली पाहिजेत, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. 

शारदानगर येथील कार्यक्रमात बोलताना माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी साखरेचे दर २६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले असल्याबाबत चिंता व्यक्त केली, त्यांच्या भाषणाचा संदर्भ घेत पवार यांनी वरील मत व्यक्त केले. पवार म्हणाले, ‘‘जगभरातील साखर उत्पादक देशांनी अधिक साखर उत्पादन केल्याने किमती घसरल्या व देशातही गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाल्याने जागतिक बाजारात निर्यातीची तयारी केली असली, तरी त्यांच्याशी स्पर्धा करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. आजचे साखरेचे दर आणखी २५०० रुपयांपर्यंत गडगडतील, तसे झाल्यास केंद्र सरकारने ठरवलेली एफआरपी देणे शक्य राहणार नाही. साखर उद्योगात हा उताराचा काळ आहे, त्यातील उताराच्या काळाचा वेग योग्य राखला नाही व तो खंडित केला नाही, तर त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील.’’ 

‘‘देशात बदल होतोय, देशाची अन्नधान्याची गरज भागविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण केली. त्यातून एकेकाळी आयात करणारा देश आज निर्यातदार बनला आहे. मात्र त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांत शेतीचे अर्थशास्त्र बारकाईने समजून घेऊन ते मजबूत करायला हवेत. पिकाच्या उत्पादन खर्चाला रास्त भाव मिळवून देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. संकटे येतात, आज साखरेपुढे संकट आहे, मात्र पुढील वर्षी ते अधिक मोठे आहे,’’ असे पवार म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...