जगातील साखर उत्पादन ७ टक्क्यांनी वाढणार

साखर उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक अाहे. अागामी हंगामात भारतातील साखर उत्पादन ४.५ दशलक्ष टनांनी वाढून २४.८ दशलक्ष टनांवर पोचेल, असे साखर संघटनेने जाहीर केलेल्या तिमाही अहवालात म्हटले अाहे.
साखर हंगाम २०१७-१८
साखर हंगाम २०१७-१८

नवी दिल्ली : भारत, युरोपीय देश, थायलंड अाणि चीनमध्ये साखर उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे. यामुळे जगातील साखर उत्पादनात २०१७-१८ या वर्षातील हंगामात ७ टक्क्यांनी वाढ अपेक्षित अाहे. या वर्षात साखर उत्पादन १७९.३० दशलक्ष टन होईल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय साखर संघटनेने व्यक्त केला अाहे. साखर उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक अाहे. अागामी हंगामात भारतातील साखर उत्पादन ४.५ दशलक्ष टनांनी वाढून २४.८ दशलक्ष टनांवर पोचेल, असे साखर संघटनेने जाहीर केलेल्या तिमाही अहवालात म्हटले अाहे. जगात यंदाच्या वर्षात साखरेचा वापर १७४.६६ दशलक्ष राहणार अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अागामी हंगामात साखरेचा वापर काही प्रमाणात अधिक होणार अाहे. गेल्या वर्षी १७१.६३ दशलक्ष टन साखरेचा वापर झाला होता; तसेच जागतिक पातळीवर निर्यातीसाठी साखरेची उपलब्धतता लक्षणीय राहण्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. साखरेची निर्यात मागणीपेक्षा अधिक राहील. साखरेच्या निर्यातीत १.९१ दशलक्ष टनांनी वाढ होऊन एकूण निर्यात ६२.१५ दशलक्ष टन होईल, असा अंदाज साखर संघटनेने व्यक्त केला अाहे. गेल्या दोन वर्षांत साखरेच्या साठ्यात तूट निर्माण झाली होती. यंदा साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक राहण्याची शक्यता अाहे. यंदाच्या वर्षात साखरेची मागणी ५७.६२ दशलक्ष टन राहील. गेल्या वर्षी ६०.१२ दशलक्ष टन साखरेची मागणी राहिली होती. यामुळे ४.६४ दशलक्ष टन अतिरिक्त साखर शिल्लक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com