सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाच्या हप्त्याची प्रतिक्षा
विकास जाधव
सोमवार, 25 सप्टेंबर 2017
सातारा  ः दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यातील सह्याद्री व कृष्णा या दोन कारखान्यांनी दुसरा हप्ता देत तीन हजारांचा टप्पा ओलंडला असून इतर कारखाने दुसरा हप्ता किती, कधी व एकरकमी देणार का, तीन हजारांचा टप्पा गाठणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत.
 
सातारा  ः दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यातील सह्याद्री व कृष्णा या दोन कारखान्यांनी दुसरा हप्ता देत तीन हजारांचा टप्पा ओलंडला असून इतर कारखाने दुसरा हप्ता किती, कधी व एकरकमी देणार का, तीन हजारांचा टप्पा गाठणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत.
 
जिल्ह्यात २०१६-१७ मधील गळीत हंगामात १५ साखर कारखान्यांनी ५४ लाख ३१ हजार १५७ टन उसाचे गाळप करून ६५ लाख १६ हजार १८६ क्विंटल साखर उत्पादित केली. सर्वच कारखान्यांनी एफआरपीनुसार पहिला हप्ता दिला. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त दर दिला होता. जुलै, ऑगस्टमध्ये साखरेच्या किमतीत चांगली वाढ होऊन दर ३९०० ते ४००० रुपये क्विंटल दरम्यान गेले होते. यामुळे साहजिकच उसाला दुसरा हप्ता जास्त मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. या दरम्यानच सह्याद्री साखर कारखान्याने दुसऱ्या हप्ताची कोंडी फोडत ४३० रुपये प्रतिटन असा विक्रमी हप्ता जाहीर केला. 
 
या कारखान्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपयांचा फरक ठेवला आहे. यानंतर कृष्णा कारखान्यानेही दुसरा हप्ता ३०० रुपये जाहीर करून प्रतिटनास ३१०० रुपये दर दिला आहे; मात्र या कारखान्याने दुसऱ्या हप्ताचे दोन टप्पे केले आहेत. तसेच फलटण तालुक्‍यातील शरयु आणि लोकनेते हिंदूराव नाईक-निंबाळकर या कारखान्यांनी बेंदराच्या सणासाठी टनास ५० रुपयांप्रमाणे हप्ता जमा केला होता. हे अपवाद वगळता इतर कारखान्यांकडून अजून दुसरा हप्ता जाहीर करण्यात आलेला नाही. या काळात इतर कारखाने दुसरा हप्ता देतील अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असतानाही कारखान्यांकडून काहीच हालचाल झाली नव्हती.
 
आगामी गाळप हंगामाची अनेक कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला आहे. या सणाच्या तोंडावर दुसरा हप्ता मिळेल, असा शेतकऱ्यांना अंदाज असताना कारखान्यांकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. 
 
गत हंगामाच्या गाळप सुरू झाल्यापासून अनेक कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांपेक्षा जास्त किंवा बरोबरीने दर देण्याचे आश्‍वासन दिले होते. सह्याद्री कारखान्याने दुसऱ्या हप्ता ४३० रुपये देत जिल्ह्यात सर्वाधिक ३१०० रुपये दर दिला आहे. कृष्णा कारखान्याने दुसरे बिल दोन टप्प्यांत देण्याचे जाहीर करत ‘सह्याद्री’ची बरोबरी केली आहे. उर्वरित ११ कारखाने प्रतिटनास तीन हजारांचा हप्ता गाठणार का? याबाबत शेतकऱ्यांच्यात उत्सुकता लागून राहिली आहे.

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...