agriculture news in marathi, sugarcane bill paid after 8 to 10 days | Agrowon

ऊसबिल देयके आठ ते दहा दिवसांत देणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : येत्या आठ ते दहा दिवसांत एफआरपीप्रमाणे बिले अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकरी संघर्ष समितीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर बुधवारी (ता. ८) सुरू केलेले धरणे आंदोलन अखेर त्याच दिवशी रात्री उशिरा मागे घेतले.

औरंगाबाद : येत्या आठ ते दहा दिवसांत एफआरपीप्रमाणे बिले अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकरी संघर्ष समितीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर बुधवारी (ता. ८) सुरू केलेले धरणे आंदोलन अखेर त्याच दिवशी रात्री उशिरा मागे घेतले.

एफआरपीप्रमाणे कारखान्यांना घातलेल्या उसाची देयके अदा करण्याच्या मागणीसाठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर बीड जिल्ह्यातील माजलगाव व वडवणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांसमवेत शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून बुधवारी (ता. ८) धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. यासंदर्भात गंगाभिषण थावरे यांनी ३० जुलैला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला निवेदन दिले होते.

निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन सुरू केले. एफआरपीप्रमाणे उसाचे बिल देण्यात यावे, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी कारखान्याने; तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीचे उसाचे प्रतिटन ६०० रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, या वर्षी आंदोलकांना लेखी दिल्याप्रमाणे छत्रपती कारखान्याने प्रतिटन १०० रुपये, माजलगाव कारखान्याने प्रतिटन २०० रुपये; तर जयमहेश कारखान्याने प्रतिटन २५० रुपये द्यावेत आदी मागण्या धरणे देणाऱ्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या.

बुधवारी रात्री साधारणत: अकरा वाजेपर्यंत मागण्यांवर खलबते सुरू होते. या वेळी चर्चेदरम्यान प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला ४४० देयके थकीत शेतकऱ्यांच्या नावाची यादी दिली आली.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा;...सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत...
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीननवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८०...पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या...
साताऱ्यात ‘जलयुक्त’मधून सोळा हजारांवर...सातारा  : जिल्ह्यात जलयुक्त शिवार...
वऱ्हाडात पावसाचे दमदार पुनरागमनअकोला  : मागील २० दिवसांपासून पावसाचा खंड...
जोरदार पावसामुळे दाणादाण; यवतमाळ...यवतमाळ  ः जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या...
ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल...पाउलो, ब्राझील ः कॅलिफोर्निया न्यायालयाने...
रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...
डिजिटल साधनांचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी...सध्या मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल साधनांचा वापर...
उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ,...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत....
मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग...गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच...
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...