agriculture news in marathi, sugarcane conferance at kolhapur, maharashtra | Agrowon

उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये दिल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही : रघुनाथदादा पाटील
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात उसाचा पहिला हप्ता एकरकमी ३५०० रुपये व गेल्या हंगामातील अंतिम दर ४५०० रुपये घेतल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे बुधवारी (ता. १०) आयोजित ऊस परिषदेत श्री. पाटील बोलत होते. या वेळी कालिदास अापेट, शिवाजी नांदखिले, बाळासाहेब पठारे, वंदना माळी, पी. जी. पाटील वाकरेकर, ॲड. माणिक शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात उसाचा पहिला हप्ता एकरकमी ३५०० रुपये व गेल्या हंगामातील अंतिम दर ४५०० रुपये घेतल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे बुधवारी (ता. १०) आयोजित ऊस परिषदेत श्री. पाटील बोलत होते. या वेळी कालिदास अापेट, शिवाजी नांदखिले, बाळासाहेब पठारे, वंदना माळी, पी. जी. पाटील वाकरेकर, ॲड. माणिक शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

या वेळी श्री. पाटील म्हणाले, की राज्यकर्त्यांसह इतर शेतकरी संघटना व कारखानदारांनी मिळून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू केले आहे. येथून पुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही. मागणीनुसार दर न मिळाल्यास आम्ही तीव्र आंदोलन उभारू. आंदोलनाची नवी दिशा लवकर जाहीर करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.  

गेल्या काही वर्षांपासून ठिकठिकाणी विविध शेतकरी संघटना नव्याने स्थापन होत आहेत. राजकीय कार्यकर्त्यांच्या पुरस्कृत या संघटना आहेत. राजकीय पक्षाच्या मदतीवर संघटना उभ्या राहात आहेत. पण या सर्व सरकारप्रणित आहेत. सरकारने एफआरपीची रक्कम साडेनऊ वरून दहा केली. याचबरोबर एफआरपीचे तुकडे करून देण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. एकरकमी एफआरपी हा कायदा पायदळी तुडवून त्याचे तुकडे करीत शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे.

गुजरातसारखीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. पण दर देताना मात्र गुजरातपेक्षा कितीतरी कमी दर ऊसाला मिळतो. त्यामुळे गुजरात इतका दर कारखान्यांनी द्यावा, याची मागणी आमची आहे. काही कारखान्यांना ठेवीवर व्याज द्यावे लागते. म्हणून ठेवी शेअर्समध्ये वर्ग केल्या आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. या विरोधातही आम्ही भविष्यात लढणार आहोत. आताची लढाई आरपारची आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या

  • उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये मिळावा.
  • एफआरपी एकरकमी मिळावी.
  • गेल्या वर्षीची उर्वरित रक्कम २०० रुपये मिळावी.
  • भूजल अधिनियमनाच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची मुक्तता करावी.
  • शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
  • शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ झाले पाहिजे.
  • शेतकऱ्यांची शासकीय पाणीपट्टी माफ करावी.

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...