agriculture news in marathi, sugarcane crop affected by whitegrum, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात उसावर हुमणीचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

राज्यातील सोलापूर, कोल्हापूर, पैठण, परभणी, औरंगाबाद, सातारा, सांगली, नगर भागांत हुमणीचा ऊस, हळद, आले पिकात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. हुमणी कीड मुळाशी असते. त्यामुळे उपाय करताना किडीपर्यंत कीडनाशक पोचेल अशा पद्धतीने त्याचा वापर होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात.
- डॉ. पांडुरंग मोहिते, प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय हुमणी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर
 

नगर  ः जिल्ह्यातील अनेक भागांत उसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.  उत्तरेसह दक्षिण भागातही या किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊस क्षेत्र बाधित झाले आहे. आधीच बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल असताना आता हुमणीची समस्या उद्भवल्याने त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील नेमके किती क्षेत्र हुमणीमुळे बाधित झाले आहे याचा आकडा मात्र कृषी विभागाला माहित नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात यंदा उसाची ३३ हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा, अकोले, नेवासा तालुक्‍यासह शेवगाव, पारनेरच्या काही भागांत उसाचे क्षेत्र आहे. उसावर यंदा मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिकूल हवामान, सतत ढगाळ वातावरण, पाण्याचा अति वापर यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले जात आहे.

हुमणीने उसाची पांढरी मुळे खाण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे उसाचे सर्वाधिक क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला फटका बसेल, असे ब्राह्मणी येथील शेतकरी पाटील जाधव यांनी सांगितले.  जिल्ह्यात गेल्या वर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. यंदाही जवळपास ४० टक्के कापसाचे पीक या अळीने बाधित झाले आहे. त्यामुळे कापसाचे पीक धोक्‍यात असताना हुमणीच्या प्रादुर्भावाने आता ऊसही अडचणीत आला. नदीकाठच्या गावांतील ऊस क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. नगरसह राज्यातील अनेक भागांत अशी  स्थिती असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ऊस क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. सुरवातीला जिरायती भागात हा प्रादुर्भाव दिसत होता. पाच दिवसांपूर्वी आम्ही शेतकऱ्यांनी सर्व्हे केला तर बागायती भागातही हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यंदा कारखान्याला ऊस जाऊ शकत नाही. सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होणार असल्याचे ब्राम्हणी येथील शेतकरी  एकनाथ वने यांनी सांगितले.

पाऊस कमी असल्याने हुमणीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र त्यावर काय उपाययोजना करायच्या याबाबत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. हुमणीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी दिली.

सध्या नगर, मराठवाडा, सोलापूरमधील बहुतांश भागांत पाऊस नसल्याने चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला की उसाचा चाऱ्यासाठी वापर होतो. यंदा हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी उसाची चाऱ्यासाठी विक्री करू लागले आहेत. परिणामी बाजारात उसाची आवक वाढू लागल्याने दर कमी होऊ लागले आहेत.
 

 

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...