agriculture news in Marathi, sugarcane crop in danger due to drought, Maharashtra | Agrowon

कोल्हापूर : दीड लाख हेक्‍टरवरील ऊस टंचाईमुळे धोक्यात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

कोल्हापूर : वळीव पाऊस फारसा नसल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्‍टर ऊस पिकाला धोका निर्माण झाला आहे. यातच उपसा बंदी असल्याने उभ्या उसाला पाणी देण्यात अडथळे येत आहेत. जिल्ह्यात नऊ तालुक्‍यांत भूजलपातळी घटल्याने अनेक विहिरी व तलाव आटले, वेळेत पाऊस न झाल्यास जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आजरा, कागल, शाहूवाडी वगळता अन्य नऊ तालुक्‍यांत भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे.

कोल्हापूर : वळीव पाऊस फारसा नसल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेक्‍टर ऊस पिकाला धोका निर्माण झाला आहे. यातच उपसा बंदी असल्याने उभ्या उसाला पाणी देण्यात अडथळे येत आहेत. जिल्ह्यात नऊ तालुक्‍यांत भूजलपातळी घटल्याने अनेक विहिरी व तलाव आटले, वेळेत पाऊस न झाल्यास जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आजरा, कागल, शाहूवाडी वगळता अन्य नऊ तालुक्‍यांत भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे.

जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर विविध कालावधीतील उसपीक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उसाला पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. एप्रिलनंतर जूनपर्यंत दोन-तीन वळीव पाऊस झाल्यास नदीच्या पाण्यावर ताण कमी येतो. असा जिल्ह्याचा अनुभव आहे. पण, यंदा अपवाद वगळता कुठेच वळवाचा जोर नव्हता. यामुळे वळवाने ओढे-नाले भरून वाहिल्याचे चित्र दिसले नाही. विहिरी व कूपनलिकांमधून पाण्याचा मोठा उपसा झाल्याने त्याचे जलस्रोतही आटले. यामुळे नदीतील पाणी पुरवठ्यांकडे शेतकऱ्यांचा जोर वाढला. अचानकपणे पाण्याची मागणी वाढल्याने मोठ्या नद्या वगळता इतर सर्व नद्यांच्या पाण्यात चिंताजनक घट झाली. काही वेळेला शेतकऱ्यांनी मागणी करून धरणांतून पाणी सोडण्याची विनंती केली. यामुळे धरणाचा पाणीसाठा चिंताजनक बनला आहे.

हिरण्यकेशी, कृष्णा व वारणा नद्यांवर पाटबंधारे विभागाने उपसाबंदी लादली आहे. ठरावीक गावे वगळता बहुतांश ऊसपट्ट्यात पाण्याबाबत अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. वीज आहे तर उपसाबंदीमुळे पाणी घेता येत नाही; तर जिथे उपसाबंदी नाही तेथील नदीपात्रात पाणीच नाही, अशी केविलवाणी अवस्था ऊस उत्पादकांची झाली आहे.

पाणीपाळ्याही लांबल्या
पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उसाच्या पाण्याच्या पाळ्या लांबत आहेत. आठ दिवसांचे पाणी दहा ते पंधरा दिवसांवर जात असल्याने याचा विपरीत परिणाम उसावर होण्याची शक्‍यता ऊस उत्पादकांतून होत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास उसाचे पाण्याअभावी नुकसान तर होईलच; परंतु, हुमणीमुळेही उसाच्या वाढीला अडथळे निर्माण होण्याची भूती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

इतर अॅग्रो विशेष
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोरः...पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा...
खत आयातीत हेराफेरीपुणे : शेतकऱ्यांना पुरवठा करण्याच्या नावाखाली...
शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला; पण पीकविमा...सोलापूर ः पीकविम्याच्या विषयावर सातत्याने...
मराठवाड्यातील उद्ध्वस्त बागा...औरंगाबाद ः सततच्या दुष्काळानं मराठवाड्यातील...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
आयात खाद्यतेलावर १० टक्के विकासकर लावाः...लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर...
कापसावरील टोळधाडीने पाकिस्तान धास्तावलासिंध, पाकिस्तान:  पाकिस्थानातील कापूस पीक...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...