agriculture news in Marathi, sugarcane crop under threat due to rain in kolhapur district, Maharashtra | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने आडसाली ऊस संकटात
राजकुमार चौगुले
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पावसाचा पहिला फटका आडसालीला बसला आहे. कांड्या लाल होणे, बुरशीने खराब होणे आदी प्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र जोपर्यंत शिवारातले पाणी हटत नाही तो पर्यंत कोणताही उपाय करणे अशक्‍य आहे. 
- डॉ. अशोक पिसाळ, प्रभारी अधिकारी, ऊस व गूळ संशोधन प्रकल्प, कोल्हापूर

कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून राहिल्याने सुमारे ऐंशी टक्के आडसाली उसाची लावण धोक्‍यात आली आहे. आता पाऊस नाही थांबला तर उगवून आलेला ऊस कुजण्याची शक्याता आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अति पावसाने ऊस लागणी वाया जाण्याचे संकट ओढावले आहे.

यंदाचा हंगाम ऊस हंगामाच्या दृष्टीने परीक्षा पाहणारा ठरला आहे. गेल्या वर्षी ऊस लागण केल्यानंतर कमी पावसाचा फटक शेतकऱ्यांना बसला. पावसाने ओढ दिल्याने उसाची वाढ चांगली झाली नाही. यातच जमिनी कोरड्या झाल्याने हुमणीने ठिय्या मांडला. हुमणीने इतर पिकांची मुळे फस्त करीत उसावरही हल्ला चढविला. यामुळे वाढ झालेला ऊस पिवळा पडला. इथेच ऊस उत्पादन सुमारे वीस टक्क्‍यांनी घटल्याचे सूत्रांनी सांगितले.

सप्टेंबरच्या मध्यात पाऊस सुररू झाल्याने पाट भररून वाहू लागले. आज नाही तर उद्या पाऊस थांबले या प्रतीक्षेत असणाऱ्या उत्पादकांना पावसाने दररोज हजेरी लावून हैराण करून सोडले.

कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या ऊस पट्ट्यांमध्ये एकूण उसाचा कालावधी पाहिल्यास पन्नास टक्के ऊस हा सुरू हंगामाचा (डिसेंबर ते फेब्रुवारी लागण) असतो. तीस टक्के ऊस हा पूर्वहंगामी (ऑक्‍टोबर ते नोव्हेबर) तर वीस टक्के ऊस हा आडसाली (जुलै ते सप्टेंबर) प्रकारचा असतो.

सध्या आडसाली लागवड आटोपली आहे. हा ऊसवाढीच्या अवस्थेत आहे. तर खरीप काढल्यानंतर होणारी पूर्वहंगामी लागवड मात्र लांबली आहे. खरिपाची पिकेच शेतात असल्याने पूर्वहंगामासाठी तयारी करण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे. 

पूर्वहंगामी लागवड लांबणार 
खरिपानंतर पूर्वी हंगामी लागवड करण्यासाठी ऊस उत्पादक प्रयत्न करतात. सध्याची जर परिस्थिती पाहिली तर खरीप काढणी होऊन रान तयार करण्यास किमान महिन्याचा तरी कालावधी निश्‍चित लागणार आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये कितपत नव्या लागणी होतील याबाबत शंकाच आहे. अद्याप दररोज सरीवर सरीच सुरू असल्याने वाफशाचा अंदाज बांधणे कठीण आहे. यामुळे बहुतांशी लागवड ही सुरू हंगामातच होईल, अशी शक्‍यता तज्ज्ञांची आहे.  
 

इतर अॅग्रो विशेष
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
हिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मायवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती...
कापूस आयात शुल्कवाढीचा विचारमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर...
कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढेमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,...
कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के...मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...
फळबागेचे फुलले स्वप्न‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य...
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास...नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे...
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...