agriculture news in marathi, the sugarcane crush started, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरातील नऊ साखर कारखान्यांनी केले गाळप सुरू
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
कोल्हापूर : ऊसदरावर तोडगा निघाल्याने जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामास सुरवात झाली आहे. शिरोळ तालुक्‍यात काही संघटनांनी केलेले आंदोलन वगळता ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. मंगळवारपर्यंत (ता.८) जिल्ह्यातील ९ कारखान्यांनी हंगाम सुरू केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 
 
कोल्हापूर : ऊसदरावर तोडगा निघाल्याने जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामास सुरवात झाली आहे. शिरोळ तालुक्‍यात काही संघटनांनी केलेले आंदोलन वगळता ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. मंगळवारपर्यंत (ता.८) जिल्ह्यातील ९ कारखान्यांनी हंगाम सुरू केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 
 
शासकीय आदेशानुसार हंगामास आठवड्याचा विलंब झाला आहे; पण पावसामुळे वाफसा हळूहळू येत असल्याने याचे फारसे नुकसान यंदाच्या हंगामात झाले नाही. शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या दोन दिवसांत गळीत हंगामास प्रारंभ केला; पण कोणत्याही कारखान्याने दर जाहीर न करता बैठकीतील निर्णयापणे दर देण्याची घोषणा केली.
 
गडहिंग्लज भागात कमी दर मिळत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कर्नाटकच्या कारखान्यांना ऊस देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिरोळ व हातकणंगले तालुक्‍याच्या काही भागात आंदोलन अंकुश व सकल ऊसकरी परिषदेने जादा ऊस दाराची मागणी करत काही गावात ऊसतोडी रोखल्या आहेत. यामुळे या भागातील कारखान्यांच्या तोडी काहीशा संथ पद्धतीने सुरू आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने सुरू होण्याची शक्‍यता आहे.
 
यंदा कर्नाटकमधील कारखान्यांनी लवकर गाळप सुरू करून सीमा भागातील २ ते २.५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप सुरू केले आहे. महाराष्ट्रतील कारखान्यांपेक्षा या कारखान्यांनी दर जादा देऊन ऊस उत्पादकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे सीमा भागावर असणाऱ्या महाराष्ट्रमधील अनेक कारखान्यांना कर्नाटकमधील कारखान्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...