agriculture news in marathi, sugarcane crushing planning, sangli, maharashtra | Agrowon

गाळपासाठी कर्नाटकातील कारखान्यांचे प्रतिनिधी सांगलीत
अभिजित डाके
रविवार, 22 ऑक्टोबर 2017
सांगली  ः उसाला राज्यबंदी असतानाही कर्नाटकातील काही कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊसतोडणीचे नियोजन सुरू केले आहे. कर्नाटक भागातील काही कारखान्यांचे प्रतिनिधी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडे गाळपासाठी ऊस नोंदणी सुरू केली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांना रोख काटा पेमेंट देण्यासाठी देखील हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कारखानदार अस्वस्थ झाले आहेत. 
 
सांगली  ः उसाला राज्यबंदी असतानाही कर्नाटकातील काही कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊसतोडणीचे नियोजन सुरू केले आहे. कर्नाटक भागातील काही कारखान्यांचे प्रतिनिधी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडे गाळपासाठी ऊस नोंदणी सुरू केली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांना रोख काटा पेमेंट देण्यासाठी देखील हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कारखानदार अस्वस्थ झाले आहेत. 
 
जिल्ह्यातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होण्याअगोदरच कर्नाटकमधील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मंत्री समितीच्या बैठकीत १ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापूर्वी कारखाने सुरू केल्यास उत्पादित झालेली साखर जप्त केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करण्यासाठी नोव्हेंबरची वाट पाहत आहेत.
 
त्यातच कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ऊस कर्नाटक राज्यात गाळपासाठी जाणार असल्याने सांगलीतील कारखानदार अस्वस्थ झाले आहेत.
 
सध्या ऊस हा कमी उताऱ्याचा आहे. तरीही कर्नाटकातील कारखान्याचा या उसावर डोळा आहे. ते शेतकऱ्यांना काटा पेमेंट देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून उसाची नोंद करून घेण्यात येत आहे. प्रतिटन ३ हजार रुपये पहिली उचल देण्यात येणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. मात्र उसाची रिकव्हरी कमी असताना तीन हजार रुपये देणे कर्नाटकातील कारखान्यांना शक्‍य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
 
जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अंदाजे ७ हजार हेक्‍टरने वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १६ कारखानदारांनी गाळपासाठी तयारी केली आहे. कारखान्यांच्या तुलनेत यंदाही उसाची कमतरता आहेत. जिल्ह्यात ८० हजार हेक्‍टर उसाची नोंद झाली आहे. यामुळे यंदाही ऊसासाठी कारखान्यामध्ये स्पर्धा लागण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे.
 
त्यातच वसंतदादा कारखाना यंदा पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. याची धास्ती अन्य कारखान्यांनी घेतली आहे. असे असताना कर्नाटकातील कारखान्याचे प्रतिनिधी दाखल झाल्याने उसाचा ताळमेळ घालताना कारखान्यांची तारेवरची करसत करावी लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बारामती कृषी महाविद्यालय देशात रोल मॉडेलबारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी...
सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम...सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,...
मका विक्रीच्या रकमेसाठी जळगावमधील...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील मका विक्रीचे...
संपूर्ण कर्जमाफी; 'स्वामिनाथन'साठी...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना...
वाटाण्याच्या मुळांतील वैशिष्ट्यपूर्ण...पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची...
साखर कारखानदारीला ५ हजार कोटींचा तोटाभवानीनगर, जि. पुणे ः साखरेच्या घसरलेल्या भावाचा...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा...मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या...
खतांची कार्यक्षमता वाढवेल ठिबकचा वापरऊस पिकामध्ये केवळ पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा...
मोसंबी बागेचे खत व्यवस्थापनप्रगत देशांमध्ये मोसंबीची उत्पादकता ही हेक्टरी २५...
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...