बेळगाव जिल्ह्यात ऊसटंचाईने गाळप आव्हानात्मक
के. एम. पाटील
शनिवार, 23 सप्टेंबर 2017
संकेश्‍वर, कर्नाटक ः बेळगाव जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ऊसगाळप सुरू केले आहे. मात्र, उसाच्या टंचाईमुळे यंदाचा ऊस हंगाम येथील कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहे.
 
जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना उसाच्या पळवापळवीसाठी स्पर्धा करावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उसाला जादा दर देणे अनिवार्य ठरणार आहे.
 
संकेश्‍वर, कर्नाटक ः बेळगाव जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ऊसगाळप सुरू केले आहे. मात्र, उसाच्या टंचाईमुळे यंदाचा ऊस हंगाम येथील कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहे.
 
जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना उसाच्या पळवापळवीसाठी स्पर्धा करावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उसाला जादा दर देणे अनिवार्य ठरणार आहे.
 
जिल्ह्यातील व्यंकटेश्‍वरा (बेडकीहाळ, ता. चिक्कोडी) व कृष्णा सहकारी (हल्याण, ता. अथणी) आदी कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या (२०१६-१७) गाळप हंगामात प्रतिटनास तीन हजार दर दिला होता. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांनी प्रतिटन २५०० ते २७०० रुपये असा दर दिला होता. मात्र, ऊसटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा हंगाम कारखान्यांसाठी अडचणीचा ठरण्याची शक्‍यता आहे.
 
घटप्रभा (ता. गोकाक) सहकारी कारखान्याने १ सप्टेंबरपासून ऊसगाळप सुरू केले आहे. उर्वरित कारखान्यांनी १५ ऑक्‍टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. 
 
दरम्यान, जिल्ह्यातील ऊसपिकाची पावसाअभावी वाढ खुंटलेली आहे. त्यात हुमणी कीड, पांढरा लोकरी मावा आणि तांबेरा प्रादुर्भावामुळे ऊसपीक धोक्‍यात आल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला आहे. हा पाऊस ऊसपिकासाठी पोषक असला तरीही ऊसटंचाईची समस्या दूर होणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
 
कोल्हापूरप्रमाणे बेळगावात उसाला दर का नाही?
गोड जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या बेळगाव जिल्ह्यात सात सहकारी आणि सोळा खासगी मिळून एकूण २३ कारखाने आहेत. यंदाच्या हंगामासाठी १.९५ लाख हेक्‍टरवर उसाची उपलब्धतता आहे. शेजारील महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांप्रमाणे प्रतिटनास ३,००० ते ३,१५० रुपये दर देण्याचे अनुकरण बेळगाव जिल्ह्यात होणार का, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.
 
उसाच्या टंचाईमागे दुष्काळी परिस्थिती हे जरी प्रमुख कारण असले, तरी उसाला योग्य किफायतशीर दर देण्यास बेळगाव जिल्ह्यातील कारखाने पिछाडीवर असल्याचा सूर शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...