नांदेड विभागातील साखर कारखान्यांची धुराडी थंडावली

ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम

नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील ३२ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्यांनी १ कोटी १७ लाख ३६ हजार ६६९ टन ऊस गाळप केला. सरासरी १०.६६ टक्के उताऱ्याने एकूण १ कोटी २५ लाख ७ हजार ६२६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील पाच जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामास १ नोव्हेंबरपासून सुरवात झाली. यंदाचा गाळप हंगाम १४ दिवस ते ६ महिने १० दिवसांचा राहिला. नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे गाळप १५ मे रोजी बंद झाले.

या वर्षी परभणी जिल्ह्यातील सर्व ५ खासगी साखर कारखान्यांनी एकूण १७ लाख ७४ हजार ५८०.५५ टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.३१ टक्के उतायाने १८ लाख ३० हजार १४१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.०८ टक्के आला आहे. त्रिधारा-नृसिंह साखर कारखान्याचा गाळप हंगाम १४ दिवसांचा राहिला.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ सहकारी साखर कारखान्यांनी एकूण ११ लाख २४ हजार ७५६ टन ऊस गाळप केला. या कारखान्यांचा सरासरी १०.८४ टक्के साखर उतारा असून, त्यांनी १२ लाख १८ हजार ७७५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. भाऊराव चव्हाण युनिट २ डोंगरकडा या कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.५३ टक्के आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी अशा एकूण ५ साखर कारखान्यांनी यंदा एकूण १३ लाख ९१ हजार ९२९ टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.९३ टक्के साखर उताऱ्याने १५ लाख २१ हजार ४५१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सर्वाधिक काळ चालला. या कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.३० टक्के आला आहे.

लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी अशा एकूण ८ साखर कारखान्यांनी यंदा एकूण ३५ लाख ६९ हजार ८८८ टन ऊस गाळप केले आहे. या कारखान्यांचा सरासरी ११.२४ टक्के साखर उतारा आला असून, एकूण ४० लाख १३ हजार ९८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जागृती शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.७९ टक्के आला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ सहकारी आणि ७ खासगी असे एकूण १० साखर कारखान्यांनी ३८ लाख ७५ हजार ५१४ टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.१२ टक्के उताऱ्याने एकूण ३९ लाख २३ हजार २७९ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नॅचरल शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.१५ टक्के आला आहे.

 नांदेड विभाग २०१७-१८ गाळप हंगाम

(गाळप टन, साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा टक्के
परभणी  १७,७४,५८० १८,३०,१४१  १०.३१
हिंगोली ११,२४,७५६ १२,१८,७७५ १०.८४
नांदेड १३,९१,९२९ १५,२१,४५१ १०.९३
लातूर  ३५,६९,८८८ ४०,१३,९८० ११.४३
उस्मानाबाद १०  ३८,७५,५१४ ३९,२३,२७९  १०.१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com