Agriculture News in Marathi, Sugarcane crushing season, FRP issue, Sangli district, maharashtra | Agrowon

ऊस गाळप हंगाम सुरू; मात्र दराबाबत कोंडी कायम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017
सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुरांडे पेटू लागली आहेत. काही कारखान्यांनी गाळपही सुरू केले आहेत; मात्र यंदाच्या गळीत हंगामातील कोणता कारखाना किती दर देणार याबाबत अद्यापही चर्चा झालेली नाही. त्यामुळे दराची कोंडी फुटलेली नाही. त्यामुळे पहिली उचल किती मिळणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 
 
सांगली ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुरांडे पेटू लागली आहेत. काही कारखान्यांनी गाळपही सुरू केले आहेत; मात्र यंदाच्या गळीत हंगामातील कोणता कारखाना किती दर देणार याबाबत अद्यापही चर्चा झालेली नाही. त्यामुळे दराची कोंडी फुटलेली नाही. त्यामुळे पहिली उचल किती मिळणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 
 
जिल्ह्यात १६ साखर कारखाने आहे. त्यातील बहुतांश कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी उसाला पहिली उचल ३४०० रुपये मागितली आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांनीही उसाला पहिली उचल ३४०० रुपये मागितली आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ३५०० रुपये दराची मागणी केली आहे, तर शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे ४४५० रुपयांची मागणी केली आहे.
 
गेल्या वर्षी उसाला पहिली उचल किती देणार यावरून बैठका घेण्यात आल्या होत्या. त्याबैठकांमध्ये उसाला पहिली कोंडी फोडली होती. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील कोणत्याच कारखान्यांनी पहिली उचल काय देणार याबाबत घोषणा केलेली नाही. कारखान्यांनी पहिली उचल जाहीर करण्यासाठी काही भागात उसतोडी बंद केल्या आहेत; मात्र तरीही कारखानदार याबाबत शांतच आहेत. कारखाने आणि आंदोलन शेतकरी संघटना यांच्यात दरांसाठी बैठका घ्यावी लागणार का? असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. 
 
उद्याच्या बैठकीकडे लक्ष
कर्नाटकातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी शासकीय पातळीवर गुरुवारी (ता.२)  नोव्हेंबरला पुणे साखर आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत काय ठरणार याकडे शेतकरी, कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...