agriculture news in marathi, sugarcane crushing season of mills will start today, Maharashtra | Agrowon

साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरवात झाली असून परवाने वाटप आजपासून (ता. २०) सुरू होईल. विशेष म्हणजे साखर आयुक्तांच्या परवानगीची वाट न बघता काही कारखान्यांनी यापूर्वीच गाळपाला सुरवात केली आहे.
 

पुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरवात झाली असून परवाने वाटप आजपासून (ता. २०) सुरू होईल. विशेष म्हणजे साखर आयुक्तांच्या परवानगीची वाट न बघता काही कारखान्यांनी यापूर्वीच गाळपाला सुरवात केली आहे.
 
राज्यात यंदा किमान १०० सहकारी व ९० खासगी साखर कारखाने गाळपासाठी उतरण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात १०१ सहकारी आणि ८६ खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केली होती. त्याआधीच्या म्हणजे २०१६-१७ च्या हंगामात सहकारातील ८८ तर ६२ खासगी साखर कारखान्यांनी गाळप केले होते. खासगी कारखाने आता सहकारी कारखानदारीशी मोठी स्पर्धा करीत असून भविष्यात राज्यात उत्तर प्रदेशाप्रमाणेच खासगी कारखान्यांची संख्या वाढलेली दिसेल, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. गेल्या हंगामात सहकारी व खासगी कारखान्यांना ९.०५ लाख हेक्टरवरील उसाचे गाळप केले. त्यापासू १०७ लाख टन साखर तयार झाली होती. 

‘‘नव्या हंगामात राज्यात ११.५० लाख हेक्टरवर ऊस मिळण्याचा अंदाज होता. मात्र, हुमणी, पाणीटंचाई आणि आताच्या दुष्काळी स्थितीमुळे यंदा राज्याचे साखर उत्पादन घटेल. काही कारखान्यांना उसासाठी मोठी स्पर्धा करावी लागेल,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

कारखान्यांना ऊस गाळपाचा परवाना वाटण्याची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार असली तरी एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना परवानी न मिळणार नाही, असे साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. २९ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अजूनही २२२ कोटींची एफआरपी दिलेली नाही. आयुक्तांनी २२ कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या आरआरसी प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे.

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...