agriculture news in marathi, sugarcane crushing season status, khandesh, maharashtra | Agrowon

ऊस मिळवण्यासाठी खानदेशात कारखान्यांमध्ये स्पर्धा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017
उसाच्या बाबतीत यंदा चांगले दर राहिले. तोडणी वेळेत व व्यवस्थित झाली, तर पुढे कपाशीऐवजी अनेक शेतकरी उसाकडे वळतील. कारण उसासाठी ठिबकही कमी अधिक दरात अनेक ठिकाणी उपलब्ध होऊ लागले आहेत. खासगी कारखानदारीमुळे सहकारी कारखानदारीसमोर स्पर्धा मात्र उभी राहत आहे. 
- उदय पाटील, ऊस उत्पादक, चहार्डी, जि. जळगाव
जळगाव : खानदेशात ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आहे. त्यात खासगी व सहकारी कारखानदारांमध्ये गाळपासाठी ऊस मिळविण्याची स्पर्धा सुरू असून, खासगी कारखानदारांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे. 
 
आदिवासी सहकारी साखर कारखाना (डोकारे, ता. नवापूर, जि. नंदुरबार), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना, चहार्डी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना आणि न्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील सहकारी साखर कारखाने सुरू झाले आहेत. चोपडा कारखान्यात औपचारिकता म्हणून बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम झाला; पण प्रत्यक्ष गाळप अजून सुरू झालेले नाही.
 
खानदेशात मिळून दोनच खासगी कारखाने सुरू आहेत; पण खानदेशच्या सीमेलगत गुजरात व नाशिकमधील खासगी कारखानेही नंदुरबार, चोपडामधील उसावर ‘डोळा’ ठेवून आहेत. चोपडा, मधुकर सहकारी साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केलेले नाहीत. सातपुडा व आदिवासी सहकारी साखर कारखान्याने दर जाहीर केले आहेत. २१०० पहिली उचल आणि नंतर ३०० रुपये असे दर दोन सहकारी साखर कारखान्यांनी जाहीर केले आहेत.
 
असेच दर नाशिक व गुजरातमधील खासगी साखर कारखान्यांनी देऊ केले आहेत. चोपडा येथे खासगी साखर कारखान्यांची चार कार्यालये सुरू आहेत. या कारखान्यांचे मजूर दिवाळीनंतर दाखल झाले. नाशिक, गुजरातमध्ये चोपडा, शिरपूर, शहादा, तळोदा, नंदुरबार येथून मोठ्या प्रमाणात ऊस जात आहे. स्पर्धा वाढल्याने कोणत्याच शेतकऱ्यांचा ऊस तोडणीविना राहणार नाही, असे चित्र यंदा निर्माण झाले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव...सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय...
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडतराहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या...
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात...गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी...
देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये...
विदर्भात अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या...
आज आषाढी एकादशीपंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण ।...
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीतपुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना...
तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळीअकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड...
साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्यनवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर...
आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद लातूर  : पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन...
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे...
बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा...परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (...
दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारकपुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या...
पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकनपुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी...
पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।। ...
शेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...