agriculture news in marathi, sugarcane crushing season status, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 एप्रिल 2018
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. जिल्ह्यात या हंगामाअखेर १३२ लाख ९८ हजार २६८ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून १२.५६ टक्के उताऱ्याच्या सरासरीने १६७ लाख १ हजार १४७ क्विंटल साखर उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. जिल्ह्यात या हंगामाअखेर १३२ लाख ९८ हजार २६८ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून १२.५६ टक्के उताऱ्याच्या सरासरीने १६७ लाख १ हजार १४७ क्विंटल साखर उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 
जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचा विक्रम यंदा शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याने केला आहे . ‘दत्त शिरोळ’ने ११ लाख ८७ हजार २१ टन उसाचे गाळप केले. १२. ५५ टक्के सरासरी उताऱ्याने १४ लाख ९० हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. त्यापाठोपाठ तात्यासाहेब कोरे, वारणा आणि कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यानी ऊस गाळपात आघाडी घेतली. 
 
साखर उताऱ्यात नेहमीप्रमाणे यंदाही खासगी साखर कारखान्यांनी बाजी मारली आहे. दत्त दालमिया शुगरने जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १३.२८ टक्के साखर उतारा मिळवला. गुरुदत्त शुगरने १३.२२ टक्के इतका साखर उतारा घेतला आहे. 
 
सहकारी साखर कारखान्यांमध्ये साखर उताऱ्यात देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने बाजी मारली. या कारखान्याने १३.०५ टक्के साखर उतारा मिळवला असल्याचे कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

यंदा ऊसतोडणी कामगार जास्त न आल्याने उपलब्ध ऊस तोडणीसाठी कारखानदारांची मोठी धावपळ उडाली. शेवटच्या पंधरा दिवसांत तर जेथून मिळतील तेथून मजूर, वाहतूकदार आणून कारखान्यांनी नोंद असलेला ऊस तोडणी केला. इतर कारखान्यांचा शिल्लक असलेला ऊस ही काही मोठ्या कारखान्यांनी गाळप केल्याने यंदा जिल्ह्याच्या शिवारात तोडणीविना ऊस शिल्लक राहिला नसल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...