agriculture news in marathi, sugarcane crushing season status, marathwada, maharashtra | Agrowon

पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख ३८ हजार टन ऊस गाळप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018
औरंगाबाद : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ पैकी ११ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. २३ कारखान्यांनी आतापर्यंत ८३ लाख ३८ हजार ७५८ टन उसाचे गाळप करीत ८२ लाख ७८ हजार ८८६ क्‍विंटल साखर उत्पादन घेतले आहे. गाळप हंगाम सांगता झालेल्या साखर कारखान्यांमध्ये नंदुरबारमधील १, जळगावातील २, जालन्यातील ३ तर बीड जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांचा समावेश आहे.
 
औरंगाबाद : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ पैकी ११ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. २३ कारखान्यांनी आतापर्यंत ८३ लाख ३८ हजार ७५८ टन उसाचे गाळप करीत ८२ लाख ७८ हजार ८८६ क्‍विंटल साखर उत्पादन घेतले आहे. गाळप हंगाम सांगता झालेल्या साखर कारखान्यांमध्ये नंदुरबारमधील १, जळगावातील २, जालन्यातील ३ तर बीड जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांचा समावेश आहे.
 
बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी यंदा ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला होता. या सातही कारखान्यांनी ३४ लाख ३६ हजार ७८५ टन ऊस गाळप करून ३४ लाख ७ हजार ४६६ क्‍विंटल साखर उत्पादन केले. या सातही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९१ टक्‍के राहिला. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदविला. यापैकी तीन कारखान्यांच्या हंगामाची सांगता झाली असून, पाच कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्‍के राहिला. या कारखान्यांनी १९ लाख ८५ हजार ८२९ टन ऊस गाळपातून २० लाख ८ हजार ४७५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अजूनही सुरूच आहे. या पाचही कारखान्यांनी आजवर १४ लाख ४० हजार ५९५ टन उसाचे गाळप करत १४ लाख २९ हजार ५०५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या पाचही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९२ टक्‍के राहिला.
 
जळगाव जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ३ लाख ८६ हजार ११२ टन ऊस गाळप केले. यातून ३ लाख ४५ हजार २९० क्‍विंटल साखर उत्पादन झाले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.९४ टक्‍के राहिला. या तीन कारखान्यांपैकी दोन कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.
 
नंदुरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांपैकी दोन कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, या तीन कारखान्यांनी आजवर १० लाख ८९ हजार ४३६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी साखर उतारा ९.९९ टक्‍के राहिला, तर १० लाख ८८ हजार १५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली. 
 
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड व खानदेशातील नंदुरबार, जळगाव या पाच जिल्ह्यांतील दहा कारखान्यांचा साखर उतारा यंदा १० टक्‍क्‍यांपुढे राहिला आहे. त्यामध्ये नंदुरबार व औरंगाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन, तर बीड व जालना जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन साखर कारखान्यांचा समावेश आहे. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...