agriculture news in marathi, sugarcane crushing season status, marathwada, maharashtra | Agrowon

पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख ५४ हजार टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांमधील २३ साखर कारखान्यांनी यंदा ८३ लाख ५४ हजार ६०१. ७ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ९.९४ टक्‍के साखर उताऱ्याने ८३ लाख ५५३ क्‍विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद, जालना, बीड, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या २३ कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यामध्ये नंदूरबारमधील दोन, जळगावातील दोन, औरंगाबादमधील एक, जालन्यातील पाच तर बीडमधील सहा कारखान्यांचा समावेश आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांमधील २३ साखर कारखान्यांनी यंदा ८३ लाख ५४ हजार ६०१. ७ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ९.९४ टक्‍के साखर उताऱ्याने ८३ लाख ५५३ क्‍विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद, जालना, बीड, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या २३ कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यामध्ये नंदूरबारमधील दोन, जळगावातील दोन, औरंगाबादमधील एक, जालन्यातील पाच तर बीडमधील सहा कारखान्यांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी यंदा गाळपात सहभाग नोंदविला. या पाच कारखान्यांनी १४ लाख ४३ हजार २२३ टन उसाचे गाळप केले. यातून १४ लाख १० हजार २० क्‍विंटल साखर उत्पादन झाले. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १९ लाख ९१ हजार २२६ टन उसाचे गाळप करून २० लाख १३ हजार ९२५ क्‍विंटल साखर उत्पादन घेतले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.११ टक्‍के राहिला.

बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी ३४ लाख ४४ हजार ६०० टन उसाचे गाळप केले. यातून ३४ लाख २० हजार १६६ क्‍विंटल साखर उत्पादन झाले. या सातपैकी सहा कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, सातही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९३ टक्‍के राहिला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी १० लाख ८९ हजार ४३६ टन उसाचे गाळप केले. यामधून १० लाख ८८ हजार १५० क्‍विंटल साखर उत्पादन झाले. तीनपैकी दोन कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून, तीनही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.९९ टक्‍के राहिला.

जळगाव जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी यंदा ३ लाख ८६ हजार ११२ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ८.९४ टक्‍के उताऱ्याने ३ लाख ४५ हजार २९० क्‍विंटल साखर उत्पादन झाले. या तीनपैकी दोन कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...