agriculture news in marathi, sugarcane crushing season status, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड विभागातील बत्तीस कारखान्यांकडून एक कोटी टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018
नांदेड  ः येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय विभागांतर्गत असलेल्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील १४ सहकारी आणि १८ खासगी अशा एकूण ३२ साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात सोमवारपर्यंत (ता. १९) १ कोटी ६ लाख ९२ हजार ९५५ टन ऊस गाळप केला आहे. १ कोटी १२ लाख ६० हजार ७८६ क्विंटल साखर उत्पादन घेतले. सरासरी १०.५३ टक्के साखर उतारा आला आहे. परभणी जिल्ह्यातील २, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
 
नांदेड  ः येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय विभागांतर्गत असलेल्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील १४ सहकारी आणि १८ खासगी अशा एकूण ३२ साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात सोमवारपर्यंत (ता. १९) १ कोटी ६ लाख ९२ हजार ९५५ टन ऊस गाळप केला आहे. १ कोटी १२ लाख ६० हजार ७८६ क्विंटल साखर उत्पादन घेतले. सरासरी १०.५३ टक्के साखर उतारा आला आहे. परभणी जिल्ह्यातील २, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
 
२०१७-१८ च्या गळीत हंगामात नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यातील ५, हिंगोली जिल्ह्यातील ४, नांदेड जिल्ह्यातील ५, लातूर जिल्ह्यातील ८, उस्मानाबाद जिल्ह्यातील १० अशा पाच जिल्ह्यांतील ३२ साखर कारखान्यांनी गाळप केले.
 
सोमवारपर्यंत परभणी जिल्ह्यातील सर्व ५ खासगी साखर कारखान्यांनी एकूण १६ लाख ५६ हजार ४९३.२८ टन ऊस गाळप केला असून सरासरी १०.१८ टक्के उताऱ्याने ११ लाख ८५ हजार ७७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.९० टक्के आला आहे. रत्नप्रभा-रेणुका शुगर्स आणि मोहटादेवी नृसिंह शुगर्स या दोन साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.
 
हिंगोली जिल्ह्यातील सर्व ४ सहकारी साखर कारखान्यांनी १० लाख ७८ हजार ४४० टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.७२ टक्के साखर उतारा आला असून ११ लाख ५५ हजार ८७५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
भाऊराव चव्हाण युनिट २ डोंगरकडा या कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.४४ टक्के आला आहे. पूर्णा युनिट २ (बाराशिव) साखर कारखान्याचा गळित हंगाम आटोपला आहे.
 
नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी अशा एकूण ५ साखर कारखान्यांनी एकूण १२ लाख २८ हजार ७४ टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.७८ टक्के उताऱ्याने १३ लाख २३ हजार ५११ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.१४ टक्के आला आहे. शिवाजी सर्व्हिस स्टेशन (जय शिवशंकर) कारखान्याचे गाळप बंद झाले.
 
लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी अशा एकूण ८ साखर कारखान्यांनी ३० लाख ७४ हजार ७० टन ऊस गाळप केले आहे. सरासरी ११.०६ टक्के साखर उतारा आला असून एकूण ३३ लाख ९९ हजार ७४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.जागृती शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.५५ टक्के आला आहे.
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ सहकारी आणि ७ खासगी असे एकूण १० साखर कारखान्यांनी ३६ लाख ५५ हजार ८७८ टन ऊस गाळप केले असून सरासरी १०.११ टक्के साखर उतारा मिळाला आहे. एकूण ३६ लाख ९५ हजार ८९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नॅचरल शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.०६ टक्के आला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...