agriculture news in marathi, sugarcane crushing season status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात ३२ लाख ५९ हजार टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

पुणे : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण १७ साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत ३२ लाख ५९ हजार १६९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ३२ लाख ९६ हजार ४७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.११ टक्के एवढा असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. 

पुणे : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण १७ साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत ३२ लाख ५९ हजार १६९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ३२ लाख ९६ हजार ४७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.११ टक्के एवढा असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. 

 
जिल्ह्यात बारा सहकारी तर सहा खासगी 
साखर कारखाने आहेत. यापैकी बहुतांशी साखर कारखाने हे एक नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. थेऊर येथील यशवंत कारखाना बंद आहे. सध्या ऊस क्षेत्रात तोडणी कामगारांची चांगलीच लगबग सुरू असून साखर कारखानेही वेगाने सुरू आहेत. काही ठिकाणी उसाची उपलब्धता कमी असली तरी तो मिळविण्यासाठी ऊस पट्ट्यातून उसाची पळवापळवी सुरू आहे. त्यामुळे हंगाम लवकर संपणार अशी परिस्थिती काही कारखान्यांची आहे. 
 
जिल्ह्यातील सहकारी अकरा साखर कारखान्यांची रोजची गाळप क्षमता ४६ हजार टन एवढी आहे. या कारखान्यांनी वीस लाख ९० हजार ५२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २० लाख ९२ हजार ९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा १०.०१ टक्के आहे.
 
खासगी सहा साखर कारखान्यांची २२ हजार ५०० टन एवढी गाळप क्षमता आहे. या कारखान्यांनी अकरा लाख ६९ हजार ११७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १२ लाख ४ हजार ३७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा १०.३० टक्के एवढा आहे. 

इतर ताज्या घडामोडी
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...
हळद उत्पादकांना कोट्यवधींचा गंडाअमरावती  ः हळद उत्पादक शेतकऱ्यांचा विश्‍वास...
पशु सल्ला खरेदी केलेल्या जनावराची प्रदर्शनासाठी किंवा इतर...
बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो २५ ते ३०...सांगली  ः यंदा बेदाण्याच्या दरातही वाढ...
साताऱ्यातील ७६ शेतकऱ्यांना विमासंरक्षणसातारा ः गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा...
रेशीम कोष उत्पादकांना अनुदानासाठी...जालना : राज्यातील रेशीम उत्पादकांची बाजारपेठेची...
अकोला परिमंडळात अटल सौर कृषिपंप...अकोला  : भारनियमन, वीजबिलापासून मुक्तता,...
खते, बियाणे कमी पडणार नाहीत याची काळजी...नगर  ः खरीप हंगामात खते, बियाणे कमी पडणार...
सांगलीतील दुष्काळी भागात द्राक्षाच्या...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम संपला आहे....
सोलापुरातील कारखान्यांकडे ‘एफआरपी’चे...सोलापूर  : यंदाच्या हंगामात उसाचे गाळप...
औरंगाबाद येथे कैरी १००० ते २२०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...