agriculture news in marathi, sugarcane crushing season status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील आठ कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018
पुणे : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हळूहळू गाळप हंगाम बंद होण्यास सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होईल. साखर कारखाना स्थळावर रोजीरोटीसाठी आलेले ऊस तोड मजूर परतीच्या मार्गावर निघाले आहेत.  
 
पुणे : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हळूहळू गाळप हंगाम बंद होण्यास सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होईल. साखर कारखाना स्थळावर रोजीरोटीसाठी आलेले ऊस तोड मजूर परतीच्या मार्गावर निघाले आहेत.  
 
ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला होता. या हंगामात १८ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखाने सुरू झाले होते. गेल्या पंधवड्यापासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होऊ लागला आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अधिक असल्या कारणाने उशिराने कारखाने बंद होत आहेत.
 
जिल्ह्यात सहकारी अकरा तर खासगी सहा असे एकूण सतरा साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत १११ लाख ७४ हजार २४२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी १२६ लाख ३६ हजार ४७० क्विटंल साखरेचे उत्पादन केले असून साखर उतारा ११.३१ टक्के एवढा आहे. यात सहकारी साखर कारखान्यांनी ७४ लाख ८ हजार ५९३ टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ८३ लाख ३४ हजार ९८० क्विटंल साखरेचे उत्पादन झाले. या कारखान्यांचा साखर उतारा ११.२५ टक्के आहे. खासगी कारखान्यांनी ३७ लाख ६५ हजार ६५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ४३ लाख १ हजार ४९० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. या कारखान्यांचा साखर उतारा ११.४२ टक्के आहे. 
 
बंद झालेले साखर कारखाने 
भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, विघ्नहर, भीमाशंकर, इंदापूर, निरा भीमा, अनुराज शुगर्स, बारामती अँग्रो, दौंड शुगर, व्यंकटेश कृपा शुगर. 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...