agriculture news in marathi, sugarcane crushing season status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018
पुणे  ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नुकताच (ता. १४) संपला आहे. आता जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपल्याने पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामाच्या तयारीसाठी ऊस तोडणी कामगार आपल्या गावी जाण्यासाठी तयारीला लागले आहेत.
 
पुणे  ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नुकताच (ता. १४) संपला आहे. आता जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपल्याने पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामाच्या तयारीसाठी ऊस तोडणी कामगार आपल्या गावी जाण्यासाठी तयारीला लागले आहेत.
 
जिल्ह्यात एक नोव्हेंबरपासून गाळप हंगामास सुरुवात झाली होती. यंदा सुमारे सहा ते साडे सहा महिने साखर कारखाने सुरू राहिले आहेत. हंगामात१८ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. गेल्या महिन्यात तीन एप्रिल रोजी सर्वप्रथम पराग अॅग्रो या साखर कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला. त्यानंतर हळूहळू अन्य कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली. चौदा मे रोजी सर्वांत शेवटी माळेगाव कारखान्याचा गळीत हंगाम संपला. 
सध्या कारखाने बंद झाल्यामुळे कारखाना कार्यस्थळावरील हॉटेल, दुकांनातील ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.
 
जिल्ह्यात ११ सहकारी साखर कारखाने, तर सहा खासगी साखर कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांनी दैनंदिन गाळपक्षमता ७६ हजार २५० मेट्रिक टन होती. जिल्ह्यात या सर्व कारखान्यांनी हंगामात ११५ लाख ४० हजार ८४६ टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यातून १३१ लाख ३२ हजार ४३० क्विटंल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ११.३८ टक्के मिळाला आहे.
 
जिल्हयात सर्वाधिक गाळप बारामती अँग्रो या साखर कारखान्याने केले आहे. यंदा या कारखान्याने दहा लाख १९ हजार ६२५ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यातून ११ लाख ७१ हजार ४०० क्विटंल साखर उत्पादन झाले असून साखरउतारा सरासरी ११.४९ टक्के एवढा मिळाला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल सातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील...
पुणे विभागात खरीप पेरण्यास प्रारंभपुणे : गेल्या पंधरवड्यात पुणे विभागातील काही...
पावसाच्या खंडामुळे वऱ्हाडात पेरण्या...अकोला  : मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात...
शेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात मालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व...
रिक्त पदांचा योजनांच्या अंमलबजावणीवर...अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची...
नाशिकमध्ये जूनचा पंधरवडा कोरडाचनाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती....
मराठवाड्यात २२५३ विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद  : पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गाव...
पन्हाळा वन विभाग करणार सव्वालाख वृक्ष...कोल्हापूर ः पन्हाळा वन विभागाच्या रोपवाटिकेत यंदा...
शेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू...अमरावती   : खरीप पीककर्जाचे वाटप करताना...
नगरमध्ये पावसाचा खंड; पेरण्या खोळंबल्यानगर : पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी अजून...
'एफआरपी'च्या मागणीसाठी सोमवारपासून...कोल्हापूर  ः साखर कारखान्यांनी एफआरपीची...
कर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे...सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या...
सातारा 'झेडपी'कडून शेतकऱ्यांसाठी 'सेवा...सातारा : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत...
पीकविमा वाटपाच्या आश्‍वासनानंतर उघडले...कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे...
पुणे जिल्‍ह्यातील धरणक्षेत्रात पावसाला...पुणे : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या पावसाला...
पुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर भात...पुणे  ः गेल्या पंधरवड्यात पश्चिमेकडील...
बनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळतीढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण...
पावसाअभावी जळगावमधील १३ तालुके कोरडेचजळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) काही भागांत...
सातारा जिल्हा परिषद कृषी विभागासाठी ५...सातारा  : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.१५...
शाश्वत कृषी विकासासाठी समाज,...शेतीची तीव्रता वाढत चालली असून, त्याचे समाजावर...