agriculture news in marathi, sugarcane crushing season status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस गाळप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जानेवारी 2019

सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू असून गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वच कारखाने प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ४६ लाख ३५ हजार ६६१ टन उसाचे गाळप केले आहे. याद्वारे ५२ लाख ८४ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी उताऱ्यात सुधारणा झाल्याने साखर उत्पादनात वाढ झाली आहे. 

सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू असून गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वच कारखाने प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ४६ लाख ३५ हजार ६६१ टन उसाचे गाळप केले आहे. याद्वारे ५२ लाख ८४ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी उताऱ्यात सुधारणा झाल्याने साखर उत्पादनात वाढ झाली आहे. 

जिल्ह्यातील ऊस हंगाम मध्यावर आला असून गाळपास गती आली आहे. जिल्ह्यातील नऊ सहकारी व पाच खासगी साखर कारखान्यांनी ४६ लाख ३५ हजार ६६१ टन उसाचे गाळप केले आहे. याद्वारे ५२ लाख ८४ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. नऊ सहकारी कारखान्यांनी २५ लाख ८९ हजार ९९८ टन उसाचे गाळप केले असून याद्वारे २९ लाख ७१ हजार १९० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. खासगी पाच कारखान्यांनी २० लाख ४५ हजार ६६२ टन उस गाळप केले आहे. याद्वारे २३ लाख १३ हजार ७१० क्विंटल साखर उत्पादित केली आहेत.

सह्याद्री कारखान्याची गाळप क्षमता मोठी असल्याने या कारखान्याने सर्वाधिक सहा लाख ६७ हजार ४०० टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे आठ लाख ०६ हजार ४९५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. साखर उताऱ्यात जयवंत शुगर या खासगी कारखान्याची आघाडी असून या कारखान्याचा सरासरी साखर उतारा १२.३९ टक्के आहे. खंडाळा तालुका कारखान्याचा साखर उतारा सर्वात कमी ९.१५ टक्के आहे. सर्वच कारखान्यांकडे उस तोडणी मजूर यंत्रणा मुबलक असून ऊस तोडणी मशिनच्या संख्येत वाढ केली असल्याने कारखान्यांचे गाळप वेगात सुरू आहे.
 
एकरकमी एफआरपीकडे दुर्लक्ष
ऊस गाळप हंगाम मध्यावर आला असतानाही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच कारखान्यांनी पहिली उचल दिली आहे. ही उचल देताना एकरकमी एफआरपीऐवजी ८०-२० सूत्र स्वीकारले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपीकडे कारखान्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. एफआरपीचे तुकडे केले जात असल्याने कर्ज नवेजुने करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...